मुंबईकरांनो, वीकेंडचा प्लॅन आखताना जपून! रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Published : Dec 13, 2025, 06:17 PM IST

Mumbai Local Mega Block : 14 डिसेंबरला मध्य, पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, यामुळे अनेक लोकल रद्द होतील, उशिराने धावतील, तर ट्रान्स हार्बर लाईन पूर्णपणे बंद राहणारय. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केलं.

PREV
15
रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईकर प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. येत्या रविवार, 14 डिसेंबर रोजी मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही मार्गांवर विविध देखभाल व अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द राहणार आहेत किंवा उशिराने धावणार आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचे आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा विचार करण्याचे आवाहन केले आहे. 

25
मध्य रेल्वे – मेन लाईनवर मेगाब्लॉक

ब्लॉकचा विभाग: माटुंगा – मुलुंड

वेळ: सकाळी 11:05 ते दुपारी 3:45

या कालावधीत अप आणि डाऊन जलद (फास्ट) मार्ग बंद राहणार आहेत. त्यामुळे अनेक फास्ट लोकल्स स्लो मार्गावरून चालवण्यात येतील.

CSMTहून सकाळी 10:36 ते दुपारी 3:10 दरम्यान सुटणाऱ्या डाउन फास्ट लोकल्स माटुंग्यानंतर स्लो मार्गावर वळवण्यात येतील

या गाड्या मुलुंडपर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील आणि नंतर पुन्हा फास्ट मार्गावर जातील

ठाण्याहून सकाळी 11:03 ते दुपारी 3:38 दरम्यान सुटणाऱ्या अप फास्ट लोकल्सही मुलुंडनंतर स्लो मार्गावर धावतील

या बदलांमुळे काही लोकल सेवा सुमारे 15 मिनिटे उशिराने पोहोचू शकतात. 

35
मध्य रेल्वे – ट्रान्स हार्बर लाईन पूर्ण बंद

ब्लॉकचा विभाग: ठाणे – वाशी / नेरूळ

वेळ: सकाळी 11:10 ते दुपारी 4:10

या कालावधीत ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

ठाणे–वाशी

ठाणे–नेरूळ

ठाणे–पनवेल

या मार्गावरील प्रवाशांना पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा लागणार आहे. 

45
पश्चिम रेल्वे – बोरिवली ते गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक

ब्लॉकचा विभाग: बोरिवली – गोरेगाव

वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 3:00

पश्चिम रेल्वेच्या स्लो मार्गावर मेगाब्लॉक असल्यामुळे

स्लो लोकल्स फास्ट मार्गावरून चालवण्यात येतील

गोरेगाव–बोरिवली दरम्यानची नियमित स्लो सेवा उपलब्ध राहणार नाही

काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत

अंधेरी आणि बोरिवलीकडे जाणाऱ्या काही गाड्या हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत चालवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

55
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही कामे सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वे सेवेसाठी अत्यावश्यक आहेत.

प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासावे

शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा

गर्दी टाळण्यासाठी प्रवासाचे नियोजन बदलावे

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories