वाशी खाडी पूल पार करून मेट्रो मानखुर्दपासून शीव–पनवेल महामार्गासोबत समांतर धावेल आणि नेरूळ, सीवूड्स, बेलापूर, उरण मार्गे NMIA पर्यंत पोहोचेल. सध्या मुंबई ते नवी मुंबई विमानतळ प्रवासासाठी 1.5 ते 2 तास लागतात; परंतु मेट्रो 8 मुळे हा वेळ निम्म्यापेक्षाही कमी होणार आहे.
भूमिगत टप्पा : छेडानगर ते CSMIA (9.25 किमी)
उन्नत टप्पा : उर्वरित 25.63 किमी
ही मार्गिका प्रवाशांसाठी वेगवान, सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देणार आहे.