काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं आहे. त्याच पाण्यातून ट्रॅफिक पोलीस, विद्यार्थी आणि प्रवाशांना वाट काढत जावं लागत आहे. साचलेल्या पाण्यातून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
वरळी आणि बोरीवलीतही सकाळपासून जोरदार पाऊस झालाय. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे. वरळी कोळीवाड्यात पाणी साचलं असून दादरमधील काही ठिकाणी पाणी साचलंय.
मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत पुढचे चार तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर समुद्रालाही उधाण आलं असून १३ फूट उंच लाटा उसळत आहेत.