कुलाब्यात FDA ची मोठी कारवाई; मॅकडोनाल्ड्ससह 13 रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

Published : Aug 21, 2026, 10:21 PM IST
FDA Inspection

सार

कुलाब्यात महाराष्ट्र एफडीएने मोठी कारवाई करत मॅकडोनाल्ड्सच्या किऑस्कसह रेडिओ क्लब, स्टेटस रेस्टॉरंट आणि अन्य १३ रेस्टॉरंटचे परवाने निलंबित केले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) कुलाबा परिसरातील खाद्य आस्थापनांवर मोठी कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मॅकडोनाल्ड्सच्या किऑस्कसह रेडिओ क्लब, स्टेटस रेस्टॉरंट आणि अन्य १३ रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान अस्वच्छता, अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील त्रुटी आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले.

रेडिओ क्लबमध्ये झुरळे, माशांचा वावर

कुलाब्यातील बॉम्बे प्रेसिडन्सी रेडिओ क्लब लिमिटेडवर एफडीएने १९ ऑगस्ट रोजी अचानक तपासणी केली. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात माशांचा वावर, मृत झुरळ आणि भांडी धुण्याच्या ठिकाणी कॉक्रोच ट्रॅप आढळले. तपासणीत तब्बल ४७ टक्के नियमांचे पालन झाले नसल्याचे समोर आले.

अन्नपदार्थांच्या ठिकाणी केमिकल

अन्न तयार करण्याच्या ठिकाणी छताचे प्लास्टर तुटलेले होते. त्यामुळे प्लास्टर फूडमध्ये पडण्याचा धोका निर्माण झाला होता. अन्नपदार्थ आणि ड्रिंक जवळच वॉशिंग पावडरसह इतर केमिकल्स ठेवण्यात आले होते. भांडी आणि फूड्स थेट जमिनीवर ठेवलेले आढळले.

नॉन-व्हेज पदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा फ्रिजही अस्वच्छ होता. फ्रोजन फूड्सच्या तापमान नियंत्रणाबाबतही त्रुटी आढळल्या. कर्मचाऱ्यांचे घामाने भिजलेले हेल्मेट आणि कपडे खाद्यपदार्थांच्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. किचनचा दरवाजा व्यवस्थित बंद नव्हता. तसेच स्टोव्हच्या जवळच कचरापेटी ठेवण्यात आली होती. परिसरात थुंकल्याचे डागही आढळून आले.

मूलभूत स्वच्छता नियमांकडेही दुर्लक्ष

तपासणीदरम्यान हात न धुता अन्नपदार्थांना स्पर्श करणे, कॅलिब्रेट न केलेले रेफ्रिजरेशन युनिट वापरणे आणि खाद्यपदार्थांचे तापमान मोजल्याची नोंद उपलब्ध नसणे, अशा गंभीर त्रुटी आढळल्या. या उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर एफडीएकडून FSS Act, 2006 च्या कलम 32(3) अंतर्गत कारवाई करत क्लबचा परवाना निलंबित केला. निलंबनाच्या काळात खाद्यपदार्थांची खरेदी, विक्री आणि वितरण करण्यास तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन कायम राहिल्यास कठोर कारवाईचा इशाराही एफडीएने दिला आहे.

मॅकडोनाल्ड्सच्या किऑस्कवरही कारवाई

कुलाब्यातील मॅकडोनाल्ड्सच्या एका किऑस्कमध्ये २० पैकी १८ अन्न सुरक्षा मानकांचे पालन झाले नसल्याचे एफडीएच्या तपासणीत आढळले. याशिवाय १४८ पानांचा कथित खोटा शिस्तपालन अहवाल सादर केला होता. याशिवाय मेन्यूमध्ये उल्लेख नसताना ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.सर्व कायदेशीर आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन होईपर्यंत संबंधित किऑस्कचे अन्न व ड्रिंकचे उत्पादन, विक्री आणि वितरण बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे कुलाब्यातील रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांच्या पालनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द; जात प्रमाणपत्रही बाद, नक्की कारण काय?
Mumbai Crime : मुंबई हादरली! तृतीयपंथी बनून घरात घुसला, महिलेवर अत्याचार करून पैसेही लुटले