Mumbai Crime : मुंबई हादरली! तृतीयपंथी बनून घरात घुसला, महिलेवर अत्याचार करून पैसेही लुटले

Published : Aug 21, 2026, 04:48 PM IST
Mumbai Crime : मुंबई हादरली! तृतीयपंथी बनून घरात घुसला, महिलेवर अत्याचार करून पैसेही लुटले

सार

पवईमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल शिंदे नावाच्या २८ वर्षीय तरुणाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. अनिल शिंदे असं या आरोपीचं नाव आहे. तो तृतीयपंथी असल्याचं भासवून आणि महिलांचे कपडे घालून महिलेच्या घरात शिरला होता. घरात एक विधी करण्याच्या बहाण्याने तो आत आला आणि त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केले, असा आरोप आहे.

या घटनेनंतर पीडित महिलेने तिच्या पतीला सगळा प्रकार सांगितला आणि त्यानंतर पवई पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान, या घटनेबद्दल मीडिया रिपोर्ट्समधून वेगवेगळी माहिती समोर येत आहे. काही रिपोर्ट्सनुसार, आरोपी घरात शिरताना 'मी दृष्ट काढतो' असं म्हणाला होता. पीडित महिलेचा पती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्यामुळे, या विधीमुळे त्याला बरं वाटेल असं महिलेला वाटलं आणि तिने आरोपीला घरात घेतलं, असं तक्रारीत म्हटल्याचं समजतं.

तर, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला आहे की, आरोपीने महिलेला मूल होण्यासाठी विधी करण्याचा बहाणा केला होता. या महिलेचं लग्न होऊन जवळपास पाच वर्ष झाली होती आणि तिला मूलबाळ नव्हतं. घटनेच्या वेळी तिचा पती कामानिमित्त बाहेर गेला होता आणि ती एका वयस्क नातेवाईकासोबत राहत होती.

शिंदे याने या जोडप्याला मूलबाळ नसल्याचा फायदा घेतला आणि 'तुम्हाला मूल व्हावं यासाठी मी एक विधी करतो', असं सांगून तो घरात शिरला. त्यानंतर त्याने पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केले आणि घरातून २,००० रुपये घेऊन तो पसार झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी घरातून निघून गेल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये दिसलेल्या ऑटोरिक्षाचा माग काढत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. तक्रार दाखल झाल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी ठाण्याच्या कळवा परिसरातून अनिल शिंदेला अटक केली. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट