Mumbai News : म्हाडाचा मुंबईकरांना मोठा 'पॉकेट' शॉक! आता पैसे मोजल्याशिवाय 'हे' काम होणारच नाही; नवा फतवा जारी

Published : Dec 22, 2025, 03:51 PM IST

Mumbai News : एल्फिन्स्टन येथील डबलडेकर पुलाच्या कामामुळे 83 घरे बाधित झाली असून, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुनर्वसनासाठी घरे देण्यावरून एमएमआरडीए आणि म्हाडामध्ये 97 कोटीचा आर्थिक वाद निर्माण झाल्याने ही प्रक्रिया थांबली आहे. 

PREV
15
एल्फिन्स्टनमधील रहिवाशांसाठी म्हाडाचा धक्कादायक निर्णय

मुंबई : एल्फिन्स्टन परिसरात सुरू असलेल्या डबलडेकर पुलाच्या कामामुळे स्थानिक रहिवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुलाच्या उभारणीसाठी अनेक घरे बाधित होत असून, पुनर्वसनाबाबतचा प्रश्न आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. पुनर्वसनासाठी म्हाडाची घरे देण्याचा निर्णय झाला असला, तरी एमएमआरडीए आणि म्हाडामधील आर्थिक वादामुळे संपूर्ण प्रक्रिया अडचणीत सापडली आहे. 

25
कामाला विरोध, तरीही पूल उभारणी सुरू

एल्फिन्स्टन येथील डबलडेकर पुलाच्या कामाला सुरुवातीपासूनच स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध होता. पुलामुळे घरांवर आणि इमारतींवर परिणाम होणार असल्याने रहिवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे काही काळ हे काम थांबवण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने अखेर जुना पूल पाडून नव्या डबलडेकर पुलाचे काम पुन्हा सुरू केले आहे. 

35
83 घरांवर थेट परिणाम

या प्रकल्पामुळे दोन इमारतींमधील एकूण 83 घरे बाधित होत आहेत.

लक्ष्मी निवास इमारत: 60 घरे

हाजी नुरानी इमारत: 23 घरे

या सर्व बाधित रहिवाशांच्या पुनर्वसनाची जबाबदारी एमएमआरडीएवर असून, त्यासाठी म्हाडाच्या मालकीची घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याच मुद्द्यावरून आता दोन्ही यंत्रणांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. 

45
आधी पैसे, मगच घरं म्हाडाची ठाम भूमिका

म्हाडाने आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले आहे की, घरांची किंमत आणि दुरुस्तीचा खर्च मिळाल्याशिवाय घरे ताब्यात दिली जाणार नाहीत.

म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार

रेडी रेकनरनुसार 110 टक्के दराने घरांची किंमत निश्चित करण्यात आली आहे

ही एकूण रक्कम सुमारे 97 कोटी रुपये इतकी आहे

याशिवाय, घरांच्या दुरुस्तीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले आहे

यामुळे पुनर्वसन प्रक्रिया आणखी गुंतागुंतीची झाली आहे. 

55
रहिवाशांची एकच मागणी, परिसरातच घरं

दरम्यान, दादर, प्रभादेवी, माहीम, माटुंगा, वडाळा आणि अँटॉप हिल परिसरातील एकूण 119 घरे एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दाखवण्यात आली होती. त्यापैकी 83 घरांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

मात्र, बाधित रहिवाशांची ठाम मागणी आहे की, त्यांना याच आसपासच्या परिसरात पुनर्वसनाची घरे मिळावीत. त्यामुळे रहिवाशांचा रोष वाढू नये आणि प्रकल्पाला विलंब होऊ नये, यासाठी एमएमआरडीए आणि म्हाडामधील वादावर लवकर तोडगा निघणे अत्यावश्यक आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories