Mumbai Crime : मुंबईतील शाळेतील शिक्षिकेवर अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंधांचे गंभीर आरोप; दारू, पंचतारांकित हॉटेल आणि लैंगिक शोषणाचा तपास सुरू

Published : Jul 05, 2025, 11:08 AM ISTUpdated : Jul 05, 2025, 11:21 AM IST
Khandwa  shocking crime

सार

मुंबईच्या एका प्रतिष्ठित शाळेतील 40 वर्षीय शिक्षिकेला अल्पवयीन, 16 वर्षीय विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याशिवाय शिक्षिकेवर विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप लावण्यात आला आहे. 

मुंबई : मुंबईतील एका नामांकित शाळेतील 40 वर्षीय महिला शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्याशी बेकायदेशीर शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सध्या सखोल तपास सुरू आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शिक्षिकेने विद्यार्थ्याचे वारंवार लैंगिक शोषण केले असून, त्याला दारू पाजून पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन संबंध ठेवत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

शाळेतील गुपित आणि राजीनाम्याचा प्रश्न

शाळेतील या शिक्षिकेने एप्रिल 2024 मध्ये राजीनामा दिला होता, मात्र तो स्वेच्छेने होता की तिला जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडलं गेलं, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाची सुरुवात जानेवारी 2024 पासून झाली असल्याचा आरोप आहे. तर शाळेच्या प्रशासनाने स्पष्ट केले की, "शिक्षिकेला अटक झाल्यानंतरच आम्हाला या गंभीर प्रकाराची माहिती मिळाली."

मानसिक स्थिती ठणठणीत, कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी

गुरुवारी पोलिसांनी आरोपी शिक्षिकेची मानसशास्त्रीय चाचणी केली असून, गुन्हा करताना ती मानसिकदृष्ट्या स्थिर असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर तिला POCSO कायद्यानुसार विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने तिला 16 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

शाळेची भूमिका आणि पुढील तपास

या प्रकरणामुळे शाळेच्या जबाबदारीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून शिक्षिकेची नेमणूक, विद्यार्थ्याचा प्रवेश, तसेच राजीनाम्याची पार्श्वभूमी तपासली जात आहे.शाळेला आधीपासून याबाबत कोणतीही माहिती होती का, याचाही तपास केला जात आहे.या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा पुन्हा समोर आला असून, पालकांमध्ये चिंता वाढली आहे. पोलीस अधिक तपशीलवार चौकशी करत असून लवकरच यामागील संपूर्ण सत्य उघड होण्याची शक्यता आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

डिसेंबर २०२३ च्या सुमारास शाळेच्या वार्षिक दिनाच्या सरावादरम्यान शिक्षिकेने या मुलाला पाहिले आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाने तिला टाळले. त्यानंतर, तिने एका मित्राची मदत घेतली. या मित्राने मुलाशी संपर्क साधला आणि त्याला समजावले की, तरुण मुलांचे मोठ्या वयाच्या महिलांसोबत संबंध असणे असामान्य नाही.

अखेरीस, मुलाला शिक्षिकेला भेटण्यास राजी करण्यात आले. शिक्षिकेने त्याला आपल्या कारमधून एका निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या घटनेमुळे मुलगा पूर्णपणे हादरला आणि त्याच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. मात्र, यानंतरही शिक्षिका थांबली नाही. ती त्याला दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये घेऊन जात असे. तिथे ती त्याला दारू पाजवून त्याच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होती, असे एका पोलीस सूत्राने सांगितले.

मुलाने हा प्रकार पालकांना सांगितल्यावर, बोर्डाच्या परीक्षा जवळ असल्याने आणि तो शाळा सोडणार असल्याने पालकांनी तातडीने मोठी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि शाळा सोडल्यानंतरही मुलाला नैराश्याने ग्रासले. जेव्हा आरोपी शिक्षिका आपल्या नोकरांमार्फत पुन्हा त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे पालकांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला, असे अन्य एका सूत्राने सांगितले. पोलिसांनी महिला शिक्षिकेविरुद्ध भारतीय न्याय संहिता, लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि बाल न्याय कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर (FIR) दाखल केला आणि तिला शनिवारी अटक केली. सध्या या शिक्षिकेने शाळेतील अन्य कोणत्याही विद्यार्थ्याला लक्ष्य केले आहे का, याचा तपास सुरू आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

BMC Elections : महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची मोठी रणनीती ठरली! फडणवीस–शिंदे बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Central Railway : पनवेल–कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्ससाठी ४ दिवस रात्रकालीन ब्लॉक; अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल