Mumbai : बाइक टॅक्सी सेवा बंद! ॲप आधारित कंपन्यांकडून सेवा थांबवली, सरकारमान्य ई-टॅक्सी कधी सुरू होणार यावर प्रश्नचिन्ह

Published : Jul 05, 2025, 09:12 AM IST
Bike Taxi

सार

मुंबईत राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात बेकायदेशीररित्या सुरू असणारी बाईक टॅक्सीची सुविधा आता बंद करण्यात आली आहे. ओला, उबर या कंपन्यांनी देखील त्यांची बाईक टॅक्सीची सुविधा बंद केली आहे. 

मुंबई : सध्या एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी बहुतांशजण सार्वजनिक वाहतूकीएवजी ओला, उबरच्या माध्यमातून प्रवास करणे पसंत करतात. अशातच याच कंपन्यांनी बाईक टॅक्सीची देखील सुविधा नागरिकांसाठी सुरू केली होती. पण याच सुविधेवर आता गदा आली आहे. खरंतर, राज्य सरकारच्या धोरणाविरोधात बेकायदेशीरपणे शहर आणि उपनगरांमध्ये धावणारी बाइक टॅक्सी सेवा अखेर बंद करण्यात आली आहे. ओला, उबर यांसारख्या ॲप आधारित कंपन्यांनी आपल्या मोबाईल ॲपमधून बाइक टॅक्सीचे बुकिंग बंद केले आहे. मात्र, सरकारमान्य ई-बाईक टॅक्सी सेवा कधी सुरू होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी रात्री स्वतः बाइक टॅक्सी सेवा वापरून पाहण्याचा प्रयत्न केला. आरक्षण करताना त्यांनी परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना फोन करून माहिती घेतली असता, शहरात सेवा बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

ओला आणि उबर या प्रमुख ॲप आधारित सेवा कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून दुचाकी बुकिंग सुविधा थांबवली आहे. ओला ॲपवर बाइक टॅक्सी पर्याय दिसत असला तरी बुकिंग पूर्ण होत नाही, तर उबर ॲपमध्ये हा पर्यायच दिसत नाही, अशी माहिती प्रवासी दिनेश महाडिक यांनी दिली.

या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात परिवहन विभागाने तक्रारी नोंदवल्यानंतर आझाद मैदान पोलिस ठाण्यात उबर आणि रॅपिडो विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओला विरोधातही पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे गंभीर प्रकरण मानत, मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाईचे आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Airport T1: मुंबई एअरपोर्टच्या T1 च्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा
Cordelia Cruises : 1500 ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचं आकाश उजळलं; कॉर्डेलिया क्रूझेसकडून दुसरं जहाज ‘कॉर्डेलिया स्काय' सादर