
Mumbai: सध्याच्या काळात कधी काय होईल सांगता येत नाही. समोरच्याला भीती दाखवून आसुरी आनंद मिळवण्याची आसुरी सवय माणसाला लागली आहे. एका अल्पवयीन मुलाला रिक्षात कोंबून कुत्र्याची भीती दाखवण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्याच मुलाचा या कुत्र्याने चावा घेतला असून ही घटना मानखुर्द येथे घडली आहे.
या गुन्ह्याच्या प्रकरणी मोहम्मद हसन खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या वडिलांना तुमच्या मुलाला कुत्रा चावल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी तत्कालीन त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी मुलाला विश्वासघात घेऊन विचारणा केल्यानंतर त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
मानखुर्द येथे राहणाऱ्या मोहम्मद हसन यांच्याकडे पाळीच कुत्रा आहे. त्यावेळी त्यानं मुलाला रिक्षात कोंबलं आणि त्याला कुत्र्याची भीती दाखवायला सुरुवात केली. यावेळी मुलगा जीवाची गयावया करत होता, मला वाचवा असं मोठ्यानं म्हणत होता. पण त्याच्याकडे मालकाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं.
त्यानंतर मुलाच्या हनुवटीवर कुत्र्याने चावा घेतला आणि नंतर स्वतःची सुटका करून घेतली. येथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी या घटनेचा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. १७ जुलै रोजी मुलगा त्याच्या मित्रांसोबत खेळत असताना ही दुर्दैवी घेताना घडली आहे.
मुलाला कुत्र्याची भीती दाखवल्यामुळे तो घाबरला होता. रिक्षातून त्यानं स्वतःला कसेबसे वाचवले आणि तो पळायला लागला पण कुत्र्याने त्याच्या अंगावर विविध ठिकाणी चावे घेतले. मुलगा व्हिडिओमध्ये प्रचंड घाबरल्याचे दिसून येत आहे.