महाराष्ट्रात गुजराती नव्हे, मराठी पाट्याच चालतील! मुंबई-अहमदाबाद हायवेवरील रेस्टॉरंट्सना मराठीत मेन्यू कार्ड आणि बोर्ड लावण्याचा मनसेचा इशारा

Published : Jul 26, 2025, 09:56 AM ISTUpdated : Jul 26, 2025, 09:59 AM IST
MNS

सार

मनसेकडून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सला मराठीत फलक आणि मेन्यू कार्ड हवेत असा इशारा दिला आहे. याशिवाय गुजराती भाषेतील पाट्या काढून टाकत त्या बदलण्यासही सांगितले. 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना लक्ष्य करत त्यांच्या फलकांवरील भाषा बदलण्याची मागणी केली. मनसे कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी गुजराती भाषेतील पाट्यांचे नुकसान करत, त्या मराठीत बदलण्याचा इशारा संबंधित व्यावसायिकांना दिला.

वसईमधील मनसे कार्यकर्ते प्रशांत खांबे यांनी स्पष्ट सांगितलं की, "पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी वारंवार सांगितलं आहे मराठी आणि महाराष्ट्राशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही." तसेच, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांचे मनसे प्रमुख अविनाश जाधव म्हणाले, "जर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर मराठी पाट्या लावाव्याच लागतील."

संपूर्ण घटनेचा सूर फक्त रेस्टॉरंट्सपुरता मर्यादित नव्हता. सोमवारी, नवी मुंबईच्या सीवूड्स परिसरात, मनसेच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांसोबत मिळून, गुजरात भाजपचे आमदार वीरेंद्रसिंह बहादुरसिंह जडेजा यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेरचा गुजराती फलक हटवला. हे काम पोलिसांच्या उपस्थितीत करण्यात आलं. या कारवाईच्या आधीच मनसेने गुजराती पाट्यांबाबत अल्टिमेटम जारी केला होता. त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, गुजराती फलक तात्काळ बदलून मराठी फलक लावावेत. तसेच, मराठी अस्मितेचा अपमान करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

नांदेडमध्येही शौचालयाच्या कर्मचाऱ्याला मारहाण

नांदेडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एका हिंदी भाषिक व्यक्तीला मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली आहे. खरंतर, हा व्यक्ती मराठीत बोलत नव्हता. याशिवाय व्यक्तीने मी मराठीत बोलणार नाही असेही म्हटले. यावरुन मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला.

दरम्यान, महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विरोध दर्शवला आहे. अशातच मराठी भाषेचा मुद्दाही तापला गेला आहे. या दोन्ही पक्षांनी म्हटले की, राज्यात त्रिभाषेच्या सूत्राच्या नावावर हिंदी लादण्याचा प्रयत्न केला जात आहे.याच महिन्याच्या सुरुवातीला मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यातील एका दुकानदाराला मराठीत बोलणे का गरजेचे आहे यावरुन कानशिलात लगावल्या होत्या. यानंतर काही दिवसांनी विक्रोळीमधील एका दुनकादारालाही मराठी भाषेवरुनच मारले होते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Thane Metro : ठाणेकरांनो, तुमची प्रतीक्षा संपली! मेट्रो-4 डिसेंबरमध्ये सुरू होणार
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!