MHADA Lottery: सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! कोकण मंडळाची अडीच हजार घरांची सोडत; पाहा कुठे आणि किती स्वस्त?

Published : Apr 04, 2026, 04:22 PM IST

MHADA Lottery: म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे एप्रिल अखेरीस अडीच हजार घरांसाठी बंपर लॉटरी जाहीर होणार आहे. या सोडतीत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरार येथे २० ते ३० लाखांत घरे उपलब्ध असतील. 

PREV
15
सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! कोकण मंडळाची अडीच हजार घरांची सोडत

मुंबई: मुंबईतील घरांच्या वाढत्या किमती पाहून हतबल झालेल्या मध्यमवर्गीयांसाठी म्हाडाने आशेचा किरण दाखवला आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून तब्बल अडीच हजार घरांची बंपर लॉटरी जाहीर केली जाणार असून, याची अधिकृत जाहिरात एप्रिल अखेरीस प्रसिद्ध होणार आहे. विशेष म्हणजे, यात अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी स्वस्त घरांची मोठी संधी उपलब्ध असणार आहे. 

25
२० ते ३० लाखांत हक्काचं घर!

मुंबई मंडळाच्या घरांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असताना, कोकण मंडळाने मात्र मोठा दिलासा दिला आहे. या सोडतीतील सुमारे १,००० घरे ही 'अत्यल्प' उत्पन्न गटासाठी राखीव असतील. या घरांची अंदाजे किंमत २० ते ३० लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे, अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी दिली आहे. 

35
कुठे असतील ही घरे? (प्रकल्पनिहाय तपशील)

कोकण मंडळाच्या या लॉटरीमध्ये ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरार पट्ट्यातील महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे.

चितळसर मानपाडा (ठाणे): अल्प उत्पन्न गटासाठी २०० ते २५० घरे.

बाळकुम (ठाणे): मध्यम उत्पन्न गटासाठी २०६ घरे.

२० टक्के सर्वसमावेशक योजना: खासगी विकासकांकडून म्हाडाला मिळालेली घरे

ठाणे महापालिका क्षेत्र: १३८ घरे (५ प्रकल्प)

कल्याण-डोंबिवली: ४० घरे (३ प्रकल्प)

नवी मुंबई: २१ घरे (१ प्रकल्प)

वसई-विरार: ३८ घरे (२ प्रकल्प) 

45
का आहे ही लॉटरी खास?

मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, अशा वेळी ठाणे आणि नवी मुंबई सारख्या प्राइम लोकेशन्सवर म्हाडाच्या दरात घरे मिळणे ही सर्वसामान्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. विशेषतः अत्यल्प गटासाठी असलेल्या १,००० घरांमुळे कष्टकरी वर्गाला हक्काच्या छताची शाश्वती मिळणार आहे. 

55
महत्त्वाची तारीख

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होताच अर्ज प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे कागदपत्रांची तयारी आत्तापासूनच सुरू ठेवा!

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories