MHADA Kokan Lottery 2026 : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) कोकण मंडळ 2026 मध्ये 2 हजारांहून अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये ही घरे उपलब्ध होणार आहेत.
मुंबई : घर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) अंतर्गत कोकण मंडळ 2026 मध्ये 2 हजारांहून अधिक घरांची भव्य लॉटरी जाहीर करणार आहे. ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये ही घरे उपलब्ध होणार असून, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
26
अर्ज कधी? सोडत कधी?
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर एप्रिल किंवा मे 2026 मध्ये प्रत्यक्ष सोडत प्रक्रिया पार पडू शकते. त्यामुळे इच्छुक घर खरेदीदारांनी आतापासूनच तयारीला लागणे गरजेचे आहे.
36
कुठल्या भागात मिळणार घरे?
मुंबई व उपनगरांमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्या असताना, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली हे परिसर सामान्य व मध्यमवर्गीयांसाठी परवडणारे ठरत आहेत. याच भागांमध्ये म्हाडाच्या घरांची उपलब्धता असल्याने, अनेकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कोकण मंडळाच्या लॉटरीला नेहमीच मोठा प्रतिसाद मिळतो. 2025 मध्ये अवघ्या 5 हजार घरांसाठी दीड लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे यंदाही या सोडतीकडे नागरिकांचे मोठ्या उत्सुकतेने लक्ष लागले आहे.
56
मुंबई मंडळाची लॉटरी पुढे ढकलली
दरम्यान, पुरेशी घरे उपलब्ध नसल्यामुळे म्हाडा मुंबई मंडळाची लॉटरी पुढे ढकलण्यात आली होती, ज्यामुळे अनेक इच्छुक नाराज झाले होते. अशा परिस्थितीत कोकण मंडळाची ही लॉटरी अधिक महत्त्वाची मानली जात आहे.
66
खासगी विकासक आणि PMAY घरांचा समावेश
या लॉटरीत खासगी विकासकांकडून मिळणारी 15% व 20% आरक्षित घरे, तसेच प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत उपलब्ध घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे अल्प व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर मिळण्याची मोठी संधी निर्माण होणार आहे.