
मुंबई: मुंबईत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडा एक मोठी संधी घेऊन येत आहे. शहरातील प्राइम लोकेशनवर असलेली तब्बल 84 दुकाने आता ई-लिलावाच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. 28 लाखांपासून ते 10 कोटींच्या किंमत श्रेणीतील ही दुकाने नागरिकांना गुंतवणूक आणि व्यवसाय दोन्हीसाठी उत्तम पर्याय ठरणार आहेत.
म्हाडाच्या या मोठ्या ई-लिलावात मुंबईतील विविध भागातील दुकानांचा समावेश आहे.
मुलुंड गव्हाणपाडा – 4 दुकानं
कुर्ला (स्वदेशी मिल परिसर) – 5 दुकानं
कोपरी-पवई – 15 दुकानं
मॉडेल टाऊन, मजासवाडी – 1 दुकान
गोरेगाव पश्चिम (सिद्धार्थ नगर) – 1 दुकान
गोरेगाव पूर्व (बिंबिसार नगर) – 17 दुकानं
मालवणी-मालाड – 29 दुकानं
चारकोप – 12 दुकानं
या सर्व लोकेशन्स व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत आकर्षक समजल्या जातात. भविष्यात या दुकानांची किंमत वाढण्याचीही चांगली शक्यता आहे.
म्हाडा ई-लिलावासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल.
नोंदणी सुरू : 27 नोव्हेंबर, सकाळी 11 वाजता
अर्ज आणि कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम मुदत : 21 डिसेंबर, रात्री 11:59
अनामत रक्कम भरावी लागेल (ऑनलाइनच)
ई-लिलाव : 23 डिसेंबर
निकाल जाहीर : 24 डिसेंबर
संपूर्ण प्रक्रिया eauction.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर होईल.
वेळेत ऑनलाइन नोंदणी
आवश्यक कागदपत्रे अपलोड
अनामत रक्कम भरल्याशिवाय सहभाग मान्य होणार नाही
लिलावासाठी ठरवलेली तारीख आणि वेळ पाळणे अनिवार्य
ई-लिलाव पद्धतीमुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सुलभ करण्यावर विशेष भर दिला गेला आहे.
मुंबईसारख्या शहरात दुकान मिळणे ही स्वतःमध्ये एक मोठी संधी आहे.
नवीन व्यवसाय सुरू करणे
विद्यमान व्यवसाय वाढवणे
भविष्यकालीन गुंतवणूक
या सर्वांसाठी हा लिलाव अनेकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.