साकीनाका खैरानी रोडवरील मॅनहोलमध्ये पडला माणूस, व्यक्तीबद्दल मोठी अपडेट समोर

Published : Jul 02, 2026, 02:31 PM IST
Mumbai Sakinaka Manhole

सार

चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाडं पडल्याची घटना ताजी असताना आणखी एक दुर्घटना घडली आहे. साकीनाका खैरानी रोडवर मोठी दुर्घटना घडली आहे. तेथील एका मॅनहोलमध्ये व्यक्ती पडल्याची बातमी समोर आली आहे.

मुंबई : चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाडं पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना दोन दिवसांपूर्वीच झाली. यामुळे महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आला. सदर घटना ताजी असताना मुंबईतील साकीनाका चौकातील एका मॅनहोलमध्ये माणूस पडल्याची घटना समोर आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून तातडीने त्याच्या बचावासाठी प्रयत्न केले जात होते. याच घटनेत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

नक्की काय घडले?

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आजही तशीच स्थिती आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. रस्त्यांवर साचलेले पाणी त्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेकडून काही मॅनहोलचे झाकण उघडे ठेवले जाते. अशातच आज झालेल्या पावसामध्ये एक व्यक्ती 20-25 फूट खाली मॅनहोलमध्ये पडल्याची दुर्घटना समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थितीत करण्यात आला आहे. 

व्यक्तीचा मृत्यू 

व्यक्तीचा शोध घेत असताना त्याची छत्री आणि चप्पल सापडली. आज पावसाचा जोर जास्त असल्याने तो वाहून गेला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. घटनास्थळी बचाव कार्य सुरू होते. याशिवाय 108 रुग्णवाहिका आणि स्थानिक विभाग प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती उपमहापौर संजय घाडी, आमदार दिलीप लांडे यांनी दिली. याशिवाय दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता केली जात आहे. 

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ketan Agrawal Case : आरोपी सियाला घेऊन पोलीसांनी गाठले घर, तपासातून अधिक माहिती उलगडणार
Chembur Bus Accident : चेंबूर स्कूल बस दुर्घटनेनंतर महापालिकेचा निर्णय, अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई