Ketan Agrawal Case : आरोपी सियाला घेऊन पोलीसांनी गाठले घर, तपासातून अधिक माहिती उलगडणार

Published : Jul 02, 2026, 12:43 PM IST
Ketan Agrawal Case

सार

केतन अग्रवाल प्रकरणात दररोज मोठे खुलासा होताना दिसून येत आहेत. याच घटनेप्रकरणी आता पोलीस आरोपी सियाला घेऊन तिच्या घरी पोहोचले. 

मुंबई : पुण्यातील केतन अग्रवालचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात दररोज नवे अपडेट्स समोर येत आहेत. गेल्या महिन्यात जून 18 तारखेला केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासातून समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर आरोपी सिया आणि चेतन चौधरी यांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तत्पूर्वी आरोपी सियाला घेऊन पोलीस तिच्या घरी पोहोचले आहेत. 

कोंढाव्यातील घरी पोहोचले पोलीस 

केतनच्या हत्येप्रकरणातील आरोपी सियाला घेऊन पोलीस तिच्या कोंढाव्यातील घरी पोहोचले. या ठिकाणी तपासाचा भाग म्हणून सिया तासभर घरात होती. याशिवाय हत्येच्या दिवशी सियाने कोणते कपडे परिधान केले होते ते देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, सिया आणि आरोपी चेतन चौधरीने मिळून ज्या कॅफेमध्ये बसून हत्येचा कट रचला तेथेही तिला नेण्यात आल्याची माहिती आहे. 

सियाच्या वडीलांची प्रतिक्रिया

सियाच्या वडीलांनी पोलीस घरी आल्यानंतर ANI सोबत प्रतिक्रिया दिली. प्रवीण गोयल यांनी म्हटले की, "पोलीस घरी आले होते पण मी कोणालाही भेटलो नाही. त्यांनी त्यांचे काम केले. पोलीस घरात जवळजवळ 30-45 मिनिटे होते. डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. माझी प्रकृती बरी नाही. मला या प्रकरणाबद्दल काहीही बोलायचे नाही. यावर बोलण्यासाठी माझ्यात ताकद नाही. तसेच पोलिसांनी मला काहीही विचारलेले नाही."

घटनेचे री-क्रीएशन 

आरोपी सिया आणि आरोपी चेतन चौधरी या दोघांना घेऊन पोलिसांनी घटनेचे रीक्रिएशन केले. प्रथम सियाला घेऊन पोलीस लोहगडावर गेले. तेथे त्यांनी केतनच्या हत्येवेळी कायकाय केले याचा घटनाक्रम पुन्हा सियाला करायला लावला. यानंतर आरोपी चेतन चौधरीला नेण्यात आले. तेव्हा देखील चेतनसोबत घटनेचे री-क्रिएशन करण्यात आले. याशिवाय फॉरेन्सिक गेट अ‍ॅनालिसिसही केले. यामुळे प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Local : बोरिवलीच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; दोन लोकलच्या थांब्यात मोठा बदल
Anna Hazare Health: किडनीवर संसर्गाचा परिणाम, अण्णा हजारे उपचारांसाठी मुंबईत दाखल