सिद्धिविनायक चरणी पोहोचले मुंबईतील विधानसभेचे उमेदवार...वाचा कोण काय म्हणाले

Published : Nov 23, 2024, 08:45 AM ISTUpdated : Nov 23, 2024, 08:49 AM IST
Maharashtra Vidhan Sabha Nivadnik Nikal 2024

सार

महाराष्ट्रातील 288 जागांवरील मतदानाचा निकाल आज जाहिर होणार आहे. अशातच मतदारांसह उमेदवारांमध्ये निकाल जाणून घेण्याचा उत्साह दिसून येत आहे. अशातच निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Nivadnik Nikal 2024 : महाराष्ट्रासह आज झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचे निकाल अखेर जाहीर होणार आहेत. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणा आहे. याआधी राजकीय पक्षांमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी निकालाआधीच मोठी उत्सुकतेचे वातावरणही दिसून येतेय. सर्वजण आमचाच विजय होईल असा दावा करतायत. तर दुसऱ्या बाजूला पूजा-प्रार्थनाही उमेदवारांकडून केली जात आहे.

सिद्धिविनायक चरणी पोहोचल्या शायना एनसी
मुंबईतील मुंबादेवी विधानसभेतील शिंदे यांच्या शिवसेना गटातील उमेदवार शायना एनसी यांनी निकालाआधी सिद्धिविनायकाचे दर्शन घेत पूजा केली आहे. यावेळी शायना एनसी यांनी मुंबादेवी क्षेत्रातील समस्या आणि त्यांच्या विकासासंदर्भातील दृष्टीकोण काय आहे याबद्दलही बातचीत केली. शायना एसनी यांनी म्हटले की, “मुंबादेवी येथील नागरिकांसाठी क्लस्टर विकास आणि घर ही फार मोठी समस्या आहे. याशिवाय महिलांबद्दल बोलायचे झाल्यास त्यांना सुरक्षा आणि सुविधा हवीय. येथे ना रुग्णालय आहे ना शाळा.”

महायुतीच्या विजयासाठी शायना एनसींकडून प्रार्थना
शायना एनसी यांनी सिद्धिविनायक चरणी पूजा केल्यानंतर म्हटले की, “मी महायुती सरकार पुन्हा स्थापन होण्यासाठी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे. जेणेकरुन आम्ही जनतेच्या सेवेत निरंतर कार्यरत राहू.”

माहिम विधानसभेचे उमेदवार महेश सावंत काय म्हणाले
उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते आणि माहिम मतदार संघातील उमेदवार महेश सावंत यांनीही सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना महेश सावंत यांनी म्हटले की, "सिद्धिविनायक आमचे आराध्य दैवत आहे. यामुळेच आज काय होईल हे देवालाच माहिती आहे. पण येथे राहणाऱ्या सर्वांनी पाहिले आहे कोण दिवसरात्र काम करत होते."

संजय निरुपम पोहोचले सिद्धिविनायक चरणी
शिवसेनेचे दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संजय निरुपम यांनी देखील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना संजय निरुपम यांनी म्हटले की, “सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आलो आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने मी विजयी होईन, असा मला विश्वास आहे. शिवसेनेतील उमेदवार, भाजप आणि अजित पवार यांच्या पक्षाचाही विजय होईल.” याशिवाय महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होईल असा विश्वास संजय निरुपम यांनी व्यक्त केला आहे.

भाजपाचे उमेदवारही सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
भाजपाचे कुलाबा येथील उमेदवार राहुल नार्वेकर यांनीही विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी बाप्पाचे दर्शन घेतले. पत्रकारांशी संवाद साधताना राहुल नार्वेकर यांनी म्हटले की, "महायुतीचा 175 जागांवर विजय होईल असे मला वाटते."

आणखी वाचा : 

Maharashtra Assembly Election Live Result 2024: बारामतीतून युगेंद्र पवार आघाडीवर

Maharashtra Election Result 2024: सरकार स्थापनेबाबत शरद पवारांनी केला मोठा दावा

PREV

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!