मुंबईत BEST डेपोत छताचा स्लॅब कोसळला; 3 जण जखमी, जुन्या डेपोंच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

Published : Aug 07, 2026, 11:35 AM IST
BEST Bus

सार

मुंबईतील जोगेश्वरी पूर्वेकडील बेस्ट बस डेपोमध्ये स्टोअर रूमचे छत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर बेस्टच्या जीर्ण डेपो इमारतींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील माजास BEST बस डेपोमध्ये गुरुवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. डेपोतील स्टोअर रूम-कम-विश्रांतीगृहाचे छत आणि प्लास्टर अचानक कोसळला गेला. काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर डेपोमध्ये अशाचप्रकारची घटना घडली होती. यामुळे शहरातील जुन्या बेस्ट बस डेपो इमारतींच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली दुर्घटना

घटना गुरुवारी सकाळी सुमारे 6.45 वाजता माजास बेस्ट डेपोतील एम/एस मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्टच्या स्टोअर रूम-कम-रेस्ट रूममध्ये घडली. छताचा स्लॅब आणि प्लास्टर अचानक कोसळल्याने तेथे उपस्थित असलेले तीनजण जखमी झाले. रियान शेख (19), सलमान खान (23) आणि मुजामुद्दीन खान (20) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघे मेकॅनिकचे काम करतात. तिघांना तातडीने जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

 डेपोंच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी पुन्हा ऐरणीवर

माजास डेपोतील दुर्घटनेनंतर बेस्ट बसच्या सर्व डेपोंचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणीने पुन्हा जोर धरला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बेस्ट समितीचे सदस्य नितीन नांदगावकर यांनी यापूर्वीच प्रशासनाला पत्र लिहून अनेक डेपो इमारती जीर्ण अवस्थेत असल्याचा इशारा दिला होता. या इमारती कर्मचारी आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकतात, असे त्यांनी पत्रात नमूद केले होते.

जीर्ण इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणीची मागणी

नितीन नांदगावकर यांनी सर्व डेपो आणि उपकेंद्रांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची, असुरक्षित इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याची मागणी केली होती. तसेच तपासणी झाल्यास त्याचा अहवाल 10 दिवसांत सादर करावा असेही म्हटले होते. जेणेकरुन मोठा अपघात घडल्यानंतरच कारवाई करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला होता.

22 बेस्ट डेपो पुनर्विकासाच्या मार्गावर

दरम्यान, बेस्ट प्रशासनाने डेपोच्या पायाभूत सुविधांच्या रिनोव्हेशनची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले आहे. मुंबईतील सुमारे 7.71 लाख चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या 27 बेस्ट डेपोंपैकी 22 डेपोच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कुर्ला डेपोचा पुनर्विकास पूर्ण झाला आहे. तर धारावी, काळाकिल्ला, अनिक आणि प्रतीक्षा नगर डेपो धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि मेट्रो-11 भूमिगत रेल्वे प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Dharavi Redevelopment : धारावीचा चेहरामोहरा बदलणार! अदानी ग्रुपकडून माटुंग्यात 10,432 घरांच्या बांधकामाला सुरुवात
Old Monk FSSAI Dispute : 'ओल्ड मंक'ला आता 'रम' म्हणता येणार नाही? FSSAI च्या अटीमुळे कंपनीला 500 कोटींचा फटका