Mumbai : माझ्या सीटखाली बॉम्ब ठेवलाय...प्रवाशाच्या सूचनेनंतर विमानाचे उड्डाण थांबवले, वाचा पुढे काय घडले

Published : Jan 27, 2024, 05:58 PM ISTUpdated : Jan 27, 2024, 06:05 PM IST
indigo airlines

सार

मुंबईहून लखऊच्या दिशेने जाणाऱ्या इंडिगो विमानाचे उड्डाण अचानक थांबवण्यात आले. खरंतर इंडिगोच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने माझ्या सीटखाली बॉम्ब ठेवल्याचे सर्वांना ओरडून सांगितले.

IndiGo flight from Mumbai-Lucknow :  मुंबईहून लखनऊच्या दिशेने जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) कंपनीच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने माझ्या सीटखाली बॉम्ब असल्याचे अन्य प्रवाशांना ओरडून सांगितले. याची माहिती विमानातील कर्मचाऱ्यांनी तातडीने कंट्रोल रूमला दिली. यानंतर विमानाचे उड्डाण रिशेड्यूल करण्यात आले आणि तपास यंत्रणांनी विमानात अधिक तपासणी केली. तपासणीदरम्यान काहीही संशयित वस्तू आढळून आली नाही. 

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ही घटना मुंबई येथून लखनऊच्या दिशेने जाणाऱ्या इंडिगो विमानातील आहे. इंडिगोचे विमान 6E 5264 मुंबईहून टेक ऑफ करण्यासाठी तयार होते. याचवेळी विमानातील एका प्रवाशाने माझ्या सीट खाली बॉम्ब ठेवलाय असे ओरडून सर्वांना सांगितले. मोहम्मद आयूब असे प्रवाशाचे नाव आहे. मोहम्मदने त्याच्या सीट खाली बॉम्ब असल्याच्या दिलेल्या सूचनेमुळे विमानात खळबळ उडाली.

विमानाचे उड्डाण थांबवले
विमानातील कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती कंट्रोल रूमला दिली. कंट्रोल रूमने विमानाचे उड्डाण थांबवले. यानंतर विमानात सुरक्षा कर्मचारी पोहोचले असता त्यांनी सर्वप्रथम सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवले. विमानात काही संशयित वस्तू मिळतेय का याचा शोध घेतला असता त्यांच्या हाती काही लागले नाही. यानंतर ज्या प्रवाशाने सीटखाली बॉम्ब असल्याचे म्हटले होते त्याची चौकशी केली. पण चौकशीवेळी आयूबने प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितीत न दिल्याने त्याला अटक करण्यात आली.

प्रवाशाला अटक
मोहम्मद आयूबला अटक करण्यात आली असून तो 27 वर्षांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मोहम्मदच्या विरोधात आयपीसी कलम 506 (2) आणि 505 (1)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या मोहम्मदची चौकशी केली जात आहे.

आणखी वाचा : 

मुंबई पोलिसांच्या 28 जानेवारीपर्यंतच्या सर्व सुट्ट्या या कारणास्तव रद्द

Atal Setu Accident Video : मुंबई अटल सेतूवर भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकल्याने 5 जण जखमी

Sion Road Over Bridge : सायन येथील 110 वर्ष जुना उड्डाण पुल दोन वर्षांसाठी राहणार बंद, या पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना

PREV

Recommended Stories

Thane Metro : ठाणेकरांनो, तुमची प्रतीक्षा संपली! मेट्रो-4 डिसेंबरमध्ये सुरू होणार
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!