
मुंबई - मुंबईत कधी काळी एक कोटी रुपयांचा वार्षिक पगार मिळणं म्हणजे प्रतिष्ठेचे आणि आर्थिक यशाचे लक्षण होतं. परंतु, IIM अहमदाबादचे माजी विद्यार्थी आणि सल्लागार अनुराग सिंगल यांनी त्यांच्या नुकत्याच प्रकाशित केलेल्या लिंक्डइन पोस्टमध्ये भाष्य केले आहे की, आजच्या साऊथ मुंबईच्या उच्चवर्गीय मंडळींमध्ये “रु. १ कोटी” हा आकडा एक प्रकारच्या ‘सुरुवातीचा टप्पा’ ठरतो. त्यामुळे या पगारात कौटुंबीक प्रगती साधणे अवघड जाते.
पगाराचे आकडे आणि खर्च
अनुराग सिंगल यांच्या मते, एका कोटी वार्षिक पगार भारतातल्या केवळ 0.1% वरिष्ठ कर्मचार्यांना मिळतो. मुंबईतली वाढती महागाई आणि उच्चभ्रू जीवनशैली यात भागवणे कठीण जाते. त्यामुळे ५० लाख वार्षीक पगाराच्या लोकांची आर्थिक होरपळ होताना दिसून येते.
त्यांचे पुढील मुद्दे बघा:
प्रचंड भाडे
वांद्रे पश्चिम (बांद्रा वेस्ट) किंवा वरळी या सारख्या उच्च दर्जाच्या भागात मासिक भाडे १.५–३ लाख दरम्यान आहे. त्यामुळे एका वर्षात भाड्यापोटी तब्बल १८–३६ लाख रुपये खर्च होतात. म्हणजेच पगारातील मोठा हिस्सा यात खर्च होतो.
करांचे ओझे:
नवीन कर व्यवस्थेनुसार १ कोटीच्या वार्षिक उत्पन्नावर साधारणपणे ३८ लाख किंवा त्याहून अधिक कर कट होतो. जुन्या व्यवस्थेत काही सवलती व कपात घेता येतात, परंतु तरीही कराचे ओझे खूप मोठे होते.
शहरातली जीवनशैली व इतर खर्च:
मुंबईतील मध्यम वर्गीयांचे उत्पन्न
मुंबईच्या सामान्य घरांमध्ये वार्षिक उत्पन्न सुमारे ६–८ लाख असेल, तर एका कोटीचा पगार हा त्या उत्पन्नापेक्षा तब्बल १२–१५ पट जास्त आहे. त्यामुळे काही ठिकाणी, जसे बोरिवली किंवा ठाणे, येथे एक कोटीचा पगार मिळणारा व्यक्ती ‘विशेष’ समजला जातो.
साऊथ मुंबईची क्रेझ
फायनान्स आणि टेक क्षेत्रातील अनेक अधिकारी (CEO, CFO इ.) यांचे पगार ₹१–५ कोटी किंवा त्याहूनही अधिक असतात. अशा लोकांना १ कोटी पगार कमवणारा अतिशय सामान्य वाटतो.
अल्ट्रा हाय नेट वर्थ असणारे
Knight Frank या आंतरराष्ट्रीय रिअल इस्टेट सेवा एजन्सीच्या आकडेवारीनुसार, सध्या मुंबईमध्ये २० हजारांपेक्षा जास्त नागरिक अल्ट्रा-हाय-नेट-वर्थ (UHNWI) असणारे आहेत. या लोकांचा एकंदर संपत्तीचा स्तर वेगळाच आहे. त्यामुळे, कमाई नव्हे तर संपत्ती त्यांची खरी ताकद आहे.