Mumbai Monsoon Update: मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, रुळावर पाणी साचल्यामुळं उशिराने धावणार रेल्वे

Published : Sep 15, 2025, 09:00 AM IST

मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलची वाहतूक उशिराने सुरू आहे. अंधेरीत पाणी साचल्याने वाहतुकीला अडचण निर्माण झाली आहे.

PREV
15
Mumbai Monsoon Update: मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, रुळावर पाणी साचल्यामुळं उशिराने धावणार रेल्वे

मुंबईत मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आहे. रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे उशिराने धावत असून नोकरदार लोकांची अडचण निर्माण झाली आहे. घरातून निघताना बसची चौकशी करून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

25
मुंबई आणि उपनगर परिसरात रात्रीपासून पावसाला जोरात सुरुवात

मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाळा जोरात सुरुवात झाली आहे. या पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सोमवारच्या सकाळी लोक कामाला जाण्यासाठी निघालेले असताना त्यांची तारांबळ उडाली आहे.

35
अंधेरीत पाणी साचल्याने वाहतुकीला अडचण निर्माण

अंधेरीत पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण झाली आहे. या ठिकाणची पाणी थांबवल्यामुळे वाहतूक थांबवण्यात आली असून वाहतूक गोखले ब्रिजवरून वळवण्यात आली आहे.

45
आज मुंबई आणि उपनगरात येलो अलर्ट जारी

मुंबई आणि उपनगरात आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं कामाला जाणाऱ्या लोकांची अडचण निर्माण झाली आहे. महापालिका युद्धपातळीवर काम करत असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

55
लोकल ट्रेनची वाहतूक झाली विस्कळीत

लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहे. हार्बर रेल्वेमार्गावर पाच ते दहा मिनिटं उशीराने गाड्या धावत आहेत. नोकरदार लोकांनी कामाला निघण्यापूर्वी त्या रुटवरील वाहतूक तपासून पाहावी असं सांगण्यात आलं आहे.

Read more Photos on

Recommended Stories