अनंत चतुर्दशी नंतर थांबलेला पाऊस पुन्हा सुरु झाला आहे. शनिवारी दहिसर आणि बोरिवलीत चांगला पाऊस झाला. सांताक्रूझ आणि कुलाबा येथे मात्र पाऊस अजिबात झाला नाही.
Mumbai Rain Update: मुंबईतील 'या' भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, राज्यात पावसाच्या सरी कोसळणार
मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असं सांगण्यात आलं आहे.
25
शनिवारी झाला चांगला पाऊस
अनंत चतुर्दशी झाल्यानंतर पाऊस थांबला होता पण आता परत एकदा जोरात सुरु झाला आहे. सांताक्रूझ आणि कुलाबा येथे आसपास अजिबात पाऊस झाला नव्हता. त्यानंतर शनिवारी १३ सप्टेंबर रोजी चांगला पाऊस झाला.
35
दहिसर आणि बोरिवलीत झाला चांगला पाऊस
रविवारी आणि सोमवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, रायगडमध्ये रविवारी आणि रायगड, रत्नागिरीमध्ये सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी दहिसर आणि बोरिवली परिसरात चांगला पाऊस झाला.
45
मुंबईत किती पाऊस झाला?
मुंबईत सांताक्रूझ केंद्रावर ०.१ मिलीमीटर एवढा पाऊस पडून गेला आहे. तर, कुलाबा केंद्रावर पावसाची अजिबात नोंद झाली नाही. सप्टेंबरच्या पहिल्या १३ दिवसांमध्ये कुलाबा केंद्रावर जेमतेम ४१.२ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे. तर, सांताक्रूझ येथे १३३.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
55
मुंबईतील गरमी झाली कमी
मुंबईतील गरमी कमी झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यभरात उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र येथे तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारीही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.