Manoj Jarange: लक्ष्मण हाकेंचे आंदोलन सरकार पुरस्कृत, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Published : Jun 19, 2024, 12:40 PM IST
manoj jarange patil

सार

Manoj Jarange: राज्यातील तरुणांना हात जोडून विनंती की कधी न मिळणारे आरक्षण आपल्याला मिळत आहे. एकाही तरूणाने आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, अशी विनंती देखील मनोज जरांगेंनी केली आहे. 

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनावर मनोज जरांगेंनी टीका केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन सोडणार नसल्याच मनोज जरांगेंनी यावेळी सांगितलंय. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. तसेच एकाही तरूणाने आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, अशी विनंती देखील मनोज जरांगेंनी केली आहे.

मनोज जरांगे म्हणाले, भारतात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांची मागणी ते करतात मी माझ्या समाजावर ठाम आहे. ते दिशाभूल करत आहेत. दिशाभूल करायची ती करू द्या.त्यांना आरक्षण संविधानाने दिले आहे. SC ST ला धक्का लागणार नाही त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे.त्याचं आंदोलन सरकार पुरस्कृत आंदोलन आहे. आधीचे आणि आताचे आंदोलन पाहिल्यावर लक्षात येत आहे. आंदोलनाला एवढे लोक येतात त्यावरुनच लक्षात येते. आंदोलकांना मी काही म्हणत नाही मात्र हे सरकार घडवून आणत आहे.

माझा त्यांच्या आंदोलनाला विरोध नाही : मनोज जरांगे

लक्ष्मण हाकेच्या आंदोलनावर मनोज जरांगे म्हणाले, माझा त्यांच्या आंदोलनाला विरोध नाही. मी त्यांच्यावर उत्तर देणार नाही. मी किती वेळेला पाडा म्हणालो ते सांगा. आम्ही जेवढे दिवस म्हणतो विरोध नाही तर तुम्ही आता जास्त करत आहात.

मराठ्यांच्या पोरांनी जीव देऊ नका : मनोज जरांगे

मराठा तरुणाच्या आत्महत्येवर मनोज जरांगे म्हणाले, राज्यातील तरुणांना हात जोडून विनंती की कधी न मिळणारे आरक्षण आपल्याला मिळत आहे. नंबर लागला नाही आत्महत्या करू नका. पुन्हा प्रयत्न करा,काही दिवसांनी तुम्हाला आरक्षण मिळणार तेव्हा पुन्हा प्रयत्न करा . मी आरक्षण मिळवून देणार आहे. आरक्षण मिळाल्यावर इच्छा पूर्ण होणार. नोकरी हुकली तरी चालेल मात्र तुमचा जीव महत्वाचा आहे. तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे. काळजी करू नका. तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटत नाही.पुढील दिवसात तुम्हाला आरक्षण असेल . मराठ्यांच्या पोरांनी जीव देऊ नका.

मराठा आंदोलकाची आत्महत्या

एका मराठा आंदोलकाने आयुष्याची अखेर करुन घेतल्याची माहिती समोर आली आहे. प्रसाद देठे (Prasad Dethe) असे या तरुणाचे नाव आहे. मूळचे बार्शीतील असणारे प्रसाद देठे पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते. त्यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी त्यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत प्रसाद देठे यांनी आपल्या मनातील व्यथा मांडली आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Thane Metro : ठाणेकरांनो, तुमची प्रतीक्षा संपली! मेट्रो-4 डिसेंबरमध्ये सुरू होणार
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!