
मुंबई : देशभरात गणेशोत्सवाच्या सणाला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. यामुळे मार्केट ते घरापर्यंत बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली जात असल्याचे सध्याचे सर्वत्र दृश्य दिसून आहे. खासकरुन मुंबई, पुण्यात गणेशोत्सवाची मोठी धूम पहायला मिळते. अशातच मुंबईतील काही प्रसिद्ध गणपतींचे आगमन झाले आहे. पण नवसाला पावणारा अशी ओखळ असणाऱ्या लालबागच्या राजाचा दरबार सजवण्याची जय्यत तयारी महिन्याभरापासून सुरू आहे. याचेच काही व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार
लालबागच्या राजाचा यंदाचा प्रवेशद्वार अतिशय खास आहे. मुख्य प्रवेशद्वारावर गजराज साकारण्यात आला आहे. गजराजाच्या सोंडेवर खास इमारतीसारखे डेकोरेशन करण्यात आले आहे. याशिवाय प्रवेशद्वार एखाद्या राजवाड्यात प्रवेश करताना जसे वाटेल तसे आहे. अद्याप याची तयारी पूर्णपणे झाली नसली तरीही काही सेकेंदाचा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच यंदा लालबागच्या राजाच्या डेकोरेशनची आयडिया आली असेल.
मंडपातील डेकोरेशन आणि अन्य व्यवस्था
बाप्पाच्या गाभाऱ्यातील डेकोरेशनची देखील अद्याप तयारी सुरू आहे. पण व्हिडीओमध्ये असे दिसतेय की, रंगीत फुलांच्या माळा, आकर्षक लाइटिंग करण्यात आली आहे. याशिवाय बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी देखील खास तयारी आहे. प्रत्येक वर्षी बाप्पाच्या दर्शनाला लाखोंच्या संख्येने गर्दी होत असते. यामुळे बाप्पाचे मुख दर्शन ते नवसाच्या रांगेत देखील भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळते.
मंडळाकडून भाविकांना जाहीर आवाहन