
मुंबई : जर तुम्ही येत्या रविवारी, २४ ऑगस्ट रोजी रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेने नियमित देखभाल आणि अभियांत्रिकी कामांकरिता मेगाब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. वेळेत गाठायचं ठिकाण चुकवू नका म्हणून आधीच माहिती घेऊन ठेवा!
वेळ: सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंत
CSMT (मुंबई) वरून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणाऱ्या गाड्या, माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथे थांबतील आणि मुलुंड येथे पुन्हा धीम्या मार्गावर आणल्या जातील.
या सर्व गाड्या सरासरी १५ मिनिटे उशिरा पोहोचणार आहेत. ठाण्याहून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ दरम्यान सुटणाऱ्या गाड्या, मुलुंडपासून माटुंगापर्यंत जलद मार्गावर वळवल्या जातील, आणि त्या सर्व प्रमुख स्थानकांवर थांबून माटुंगा येथे धीम्या मार्गावर परत जातील.
वेळ: सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत
या वेळेत वाशी-ठाणे आणि नेरुळ-ठाणे मार्गांवरील सेवा पूर्णतः बंद राहणार आहे.
ठाण्याहून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ आणि
पनवेल / वाशी / नेरुळहून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ दरम्यान सुटणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
जर रविवारी तुम्हाला रेल्वेने प्रवास करावाच लागणार असेल, तर या बदललेल्या वेळापत्रकाची योग्य कल्पना घेऊनच प्रवास करा. अन्यथा तुमचा प्रवास त्रासदायक होऊ शकतो आणि वेळ वाया जाऊ शकतो.
रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल अॅपवर ब्लॉक संदर्भातील अपडेट्स पाहा आणि पर्यायी मार्गांची योजना तयार ठेवा.