फडणवीसांचे विश्वासू देवेन भारती यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

Published : Apr 30, 2025, 01:03 PM ISTUpdated : Apr 30, 2025, 01:17 PM IST
deven bharati

सार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी देवेन भारती यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृहविभागाने यासंदर्भात आदेश काढला आहे. मुंबई पोलिस आयुक्त पदाचा दर्जा डीजीपी रॅन्कचा समजला जातो.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी देवेन भारती यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृहविभागाने यासंदर्भात आदेश काढला आहे. देवेन भारती १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई, नागपूरसह अनेक शहरांमध्ये पोलिस आयुक्तपद भूषविले आहे. सध्या ते मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

मुंबईचे विद्यमान पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर निवृत्त झाल्यानंतर पुढील पोलिस आयुक्त कोण होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. विवेक फणसाळकर यांना निवृत्तीनंतर एक्सटेन्शन दिले जाते की नाही हेही बघण्यासारखे होते. परंतु, आज (दि.३०) विवेक फणसाळकर निवृत्त झाले. 

मुंबईच्या नायगाव पोलिस ग्राऊंडवर त्यांचा निवृत्तीचा समारंभ पार पडला. त्यानंतर लगेच गृह विभागाने आदेश काढत देवेन भारती यांची पोलिस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. आज (दि.३०) सायंकाळी देवेन भारती हे विवेक फणसाळकर यांच्याकडून पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतील. भारती यांनी सुमारे ३५ वर्षे पोलिस दलात काम केले आहे. 

दरम्यान, मुंबई पोलिस आयुक्त पदाला आता अतिरिक्त पोलिस महासंचालक पदाचा दर्जा देण्यात आला आहे. यापूर्वी हे पद पोलिस महासंचालक दर्जाचे होते. याचाही आदेश गृहविभागाने काढला आहे. 

PREV

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!