या स्फोटानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आहेत जाणून घ्या.
डोंबिवलीतल्या एमआयडीसी भागात असलेल्या सोनारपाडा या ठिकाणी एका केमिकल कंपनीत मोठ्ठा स्फोट झाला आहे. त्यानंतर छोट्या स्फोटांचे काही आवाजही ऐकू आले आहेत. या स्फोटांमुळे साधारण तीन ते चार किमीचा परिसर हादरला आहे. डोंबिवली एमआयडीसी भागातल्या नेमक्या कुठल्या कंपनीत हा स्फोट झाला? ही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. मात्र आगीचे लोळ आणि धुराचे लोट हवेत दिसून येत आहेत. या स्फोटात १५ जण जखमी झाले आहेत. या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी एमआयडीसीवर आरोप केला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत पोस्ट केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया काय?
डोंबिवली एमआयडीसीतील अंबर केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. आठ जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्यांशी माझी चर्चा झाली असून, तेही १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमूला पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
आणखी वाचा: