मुंबईत 6 जागांसाठी सोमवारी मतदान, पुणे-मुंबई द्रुतगतीवर अवजड वाहतुकीला बंदी

Published : May 19, 2024, 08:12 PM IST
mumbai massive traffic jam

सार

मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणेकडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणेकडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ठाणे शहर, मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने ठाणे व पालघर लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होणार आहे. पुणे, कोकण, गोवा, बाजूकडून येणाऱ्या वाहनाचा मुंबई व गुजरातच्या दिशेने वाहनाचा ओघ मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत वाहतूक नियंत्रण अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार पुणे-मुंबई द्रुतगतीवर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दिशेने प्रवास करू नये

वाहतुकीबाबतच्या अधिसूचनेनुसार, दिनांक 20/5/2024 रोजी सकाळी 06.00 वा. पासून ते 24:00 वाजेपर्यंत या कालावधीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या जड अवजड, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. शहराचे सर्व मार्गावरून मार्गस्थ होण्यास, प्रवेश करण्यास आणि वाहने उभी (पार्क) करण्यास पूर्णत: बंदी राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. वाहतूक नियंत्रण अधिसूचनेनुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश नसल्याने जड अवजड वाहनांनी (दि. 20)रोजी 06.00 वाजता पासून 24.00 वाजेपर्यंत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दिशेने प्रवास करू नये, अशी सूचना जारी करण्यात आली आहे.

राज्यातील 13 जागांसाठी होणार मतदान

मुंबईतील 6 जागांसह राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना वि. शिंदेंची शिवसेना असा सामना आहे. तर भिवंडी आणि दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली होती.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!