Dasara Melava : ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात, वाहतूकीच्या मार्गांत बदल; वाचा पर्यायी रस्ते

Published : Sep 30, 2025, 11:52 AM IST
Dasara Melava

सार

Dasara Melava : ठाकरे गटाकडून दसरा मेळावा भव्य करण्याची जोरदार तयारी सुरू असून, त्याचवेळी मुंबई वाहतूक पोलिसांनी दादर-माहीम परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल जाहीर केले आहेत.

Dasara Melava : विजयादशमीच्या निमित्ताने शिवसेना (ठाकरे गट) यंदाही आपला दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात आयोजित करणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सध्या सुरू असून आगामी मुंबई महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाकरे गटाकडून हा मेळावा भव्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वाहतूक पोलिसांची विशेष तयारी

दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि वाहनं मुंबईत येण्याची शक्यता गृहीत धरून मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. २ ऑक्टोबर २०२५ रोजी दादर-माहीम परिसरात अनेक मार्गांवर नो एन्ट्री आणि नो पार्किंगची अंमलबजावणी केली जाणार आहे.

नो पार्किंग रस्ते घोषित

वाहतूक पोलिसांनी ज्या रस्त्यांवर वाहन पार्किंगस बंदी घातली आहे त्यात स्वातंत्रवीर सावरकर मार्ग (सिद्धी विनायक मंदिर जंक्शन ते एस. बँक सिग्नल), केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर, एम. बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे मार्ग, दिलीप गुप्ते मार्ग, एन. सी. केळकर मार्ग तसेच एल. जे. रोडचा समावेश आहे. या रस्त्यांवर मेळाव्याच्या दिवशी वाहनं उभी केल्यास कारवाई होणार आहे.

नो एन्ट्री आणि पर्यायी मार्ग

स्वातंत्रवीर सावरकर मार्ग (सिद्धी विनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन), राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्करमार्ग उत्तर जंक्शन, दिलीप गुप्ते मार्ग-पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन ते दक्षिण वाहिनी तसेच गडकरी चौकातून केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर या मार्गांवर वाहतूक बंद असेल. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यायी मार्गांमध्ये सिध्दिविनायक मंदिर जंक्शनमार्गे एस. के. बोले रोड, आगार बाजार, पोर्तुगीज चर्च, गोखले रोड, तसेच एल. जे. रोड आणि एम. बी. राऊत मार्गांचा वापर करता येणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Local : गुड न्यूज! लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी खास डबा; कुठल्या क्रमांकावर असेल? जाणून घ्या सविस्तर
मुंबईकरांनो लक्ष द्या! १४ आणि १५ जानेवारीला पश्चिम रेल्वेचे कंबरडे मोडणार; २८८ लोकल रद्द, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वेळापत्रक वाचा