Ahmedabad Plane Crash : क्रू मेम्बर अपर्णा महाडिक राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या नातलग

Published : Jun 12, 2025, 05:46 PM ISTUpdated : Jun 12, 2025, 05:55 PM IST
Aparna Mahadik

सार

या भीषण दुर्घटनेत विमानातील २४२ प्रवासी मृत्युमुखी पडले असल्याचे अहमदाबादच्या आयुक्तांनी सांगितले आहे. यात काही विदेशी नागरिकांचाही समावेश होता.

अहमदाबाद - गुजरातमधील अहमदाबाद येथून लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान गुरुवारी टेकऑफनंतर अवघ्या १५ मिनिटांतच कोसळले. या भीषण दुर्घटनेत विमानातील २४२ प्रवासी मृत्युमुखी पडले असल्याचे अहमदाबादच्या आयुक्तांनी सांगितले आहे. यात काही विदेशी नागरिकांचाही समावेश होता. दरम्यान, या अपघातातील क्रू मेंमर्स अपर्णा महाडीक या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.

खासदार सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील सदस्य

या दुर्घटनेनंतर समोर आलेली एक भावनिकदृष्ट्या व्यथित करणारी माहिती म्हणजे, या अपघातग्रस्त विमानात महाराष्ट्रातील खासदार सुनील तटकरे यांच्या घरातील एक सदस्य देखील होता. अपर्णा महाडिक, या एअर इंडियाच्या वरिष्ठ केबिन क्रू सदस्य असून, त्या खासदार तटकरे यांचा सख्खा भाचा अमोल यांची पत्नी आहेत. अपर्णा या एअर इंडियामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत होत्या.

क्रू मेंबर्सची संपूर्ण यादी

या विमानात एकूण १२ क्रू मेंबर्स होते. त्यांच्या नावांची यादी पुढीलप्रमाणे:

कॅप्टन सुमीत सबरवाल – वैमानिक

फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर – सह वैमानिक

श्रद्धा धवन – वरिष्ठ केबिन एक्झिक्युटिव्ह

अपर्णा महाडिक – वरिष्ठ केबिन एक्झिक्युटिव्ह

दीपक पाठक – केबिन एक्झिक्युटिव्ह

मैथिली पाटील

इरफान शेख

नंथेम सिंगसेन

मनीषा थापा

सायनीता चक्रवर्ती

नगंथोई कोंगब्रैलटपम शर्मा

रोशनी सोंघरे राजेंद्र

घटनास्थळी बचावकार्य सुरू

एनडीआरएफ, फायर ब्रिगेड, पोलीस दल आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली असून, जळालेल्या आणि विखुरलेल्या भागांमधून मृतदेह बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे. विमान अहमदाबादच्या मेघनगर परिसरात एका इमारतीवर कोसळले होते. त्यामुळे विमानावरील प्रवाशांप्रमाणेच इमारतीतील नागरिकांचाही जीव धोक्यात आला आहे.

अपर्णा महाडिक यांच्या नशिबाबाबत अनिश्चितता

अपर्णा महाडिक यांच्या मृत्यूबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. त्यांचा मृतदेह सापडलेला नसून प्रशासनाकडून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी या घटनेनंतर तातडीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. सुनील तटकरे यांचे कुटुंबीय या घटनेमुळे मोट्या मानसिक आघाताखाली आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!