Mega Block : पनवेल–कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स प्रकल्पासाठी मध्य रेल्वे पनवेलमध्ये चार दिवस रात्रीचा मेगा ब्लॉक घेणार आहे. या ब्लॉकमुळे पनवेल स्थानकातील विविध मार्गांवर परिणाम होणार असून, १२ मेल-एक्सप्रेस गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतील.
नवी मुंबई : पनवेल–कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स प्रकल्पाला गती देण्यासाठी मध्य रेल्वे सलग चार दिवस रात्रीचा मेगा ब्लॉक घेणार आहे. या कालावधीत पनवेल स्टेशनवरील विविध मार्गिकांवर महत्त्वाची कामे होणार असून अनेक मेल–एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
26
ब्लॉक कधीपासून कधीपर्यंत?
कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामांसाठी ब्लॉक रविवारपासून सुरू होणार असून 9 डिसेंबर (मंगळवार), 14 डिसेंबर (रविवार) आणि 16 डिसेंबर (मंगळवार) या दिवशीही घेतला जाणार आहे. या दिवशी रात्री 1.30 ते पहाटे 3.30 या दोन तासांच्या दरम्यान पनवेल स्थानकातील अनेक मार्गिका बंद किंवा मर्यादित क्षमतेने चालू राहतील.
36
कोणत्या मार्गांवर परिणाम?
ब्लॉकदरम्यान खालील मार्गांवर रेल्वे वाहतूक प्रभावित होणार आहे.
अप व डाउन मेल लाईन
अप व डाउन कर्जत लाईन
विविध लूप लाईन्स
इंजिन रिव्हर्सल मार्गिका
फलाट क्रमांक 6 आणि 7 वरील मुख्य मार्गिका
या काळात गाड्यांची गती कमी राहणार असून काही गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतील. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, 12 मेल–एक्सप्रेस गाड्या विलंबित राहणार आहेत.
पनवेल ब्लॉकदरम्यान उशिराने धावणाऱ्या गाड्यांची यादी
7 डिसेंबर – मध्यरात्रीनंतर
22193 दौंड–ग्वालियर एक्स्प्रेस
9 डिसेंबर – मध्यरात्रीनंतर
22149 एर्नाकुलम–पुणे
22115
22655 निजामुद्दीन मार्ग
10 डिसेंबर – मध्यरात्रीनंतर
एलटीटी–करमळी
एर्नाकुलम–हजरत
56
पनवेल ब्लॉकदरम्यान उशिराने धावणाऱ्या गाड्यांची यादी
11 डिसेंबर – मध्यरात्रीनंतर
11099 एलटीटी–मडगाव
22114 तिरुवनंतपूरम–एलटीटी
12 डिसेंबर – मध्यरात्रीनंतर
11099 एलटीटी–मडगाव
22149 एर्नाकुलम–पुणे
13 डिसेंबर – मध्यरात्रीनंतर
11099 एलटीटी–मडगाव
14 डिसेंबर – मध्यरात्रीनंतर
22149 दौंड–ग्वालियर
66
प्रवाशांनी काय करावे?
रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना विनंती केली आहे की, या कालावधीत प्रवास करण्यापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत वेळ तपासावी. पनवेल–कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील रेल्वे सेवांचा वेग, क्षमता आणि सुविधा मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत, अशी माहितीही रेल्वेकडून देण्यात आली आहे.