अनैतिक संबंधातून प्रियकराने प्रियसीचा केला खून, आईने केला संशय व्यक्त

Published : May 25, 2025, 12:15 PM IST
immoral relationship canva

सार

पालघर जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्रियंका पवार ही आपल्या प्रियकरासोबत रिसॉर्टमध्ये होती, तेव्हा अचानक तिची प्रकृती बिघडली आणि तिला मृत घोषित करण्यात आले. कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रकिनाऱ्यालगतच्या एका नामांकित रिसॉर्टमध्ये घडलेली तरुणीचा मृत्यूची घटना केवळ आकस्मिक नसून, एका संभाव्य गुन्ह्याची चाहूल देणारा आहे. २७ वर्षीय विवाहित प्रियंका पवार हिचा संशयास्पद मृत्यू हा एका ‘प्रेम सहली’चे मृत्यूत रूपांतर करणारा ठरला आहे.

प्रियंका पवार ही मुळची नालासोपारा परिसरातील असून ती आपल्या २५ वर्षीय प्रियकर मयूर साळुंखेसोबत 'दर्या निवास' या रिसॉर्टमध्ये थांबली होती. दोघांनी ऑनलाइन बुकिंग करून शनिवारी रिसॉर्टमध्ये प्रवेश घेतला. काही तासांतच प्रियंकाला अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

मृत्यूच्या थोड्याच वेळ आधी दोघांमध्ये काहीसा वाद झाला असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे. मयूर साळुंखेचा वावर संशयास्पद होता, तो मृत्यूच्या आधी रिसॉर्टच्या स्टाफकडून काही औषधांची चौकशी करत होता, अशी माहिती मिळते. मृत महिलेच्या शरीरावर कोणतेही जखमा दिसत नसल्याने मृत्यूचे कारण ‘अचानक प्रकृती बिघडणे’ असे सांगितले जात असले, तरी कुटुंबीय यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.

प्रियंकाच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे. “मुलगी आनंदात होती, एकदम अशी निघून जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. तिचं कोणाशी काही वाद नव्हते. पण त्या मुलावर आमचा आधीपासून संशय होता,” असं तिच्या आईनं म्हटलं.

सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे, पण घटनास्थळी फॉरेन्सिक टीमची तपासणी सुरू आहे. मयूर साळुंखेवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे, त्याचे कॉल रेकॉर्ड्स आणि रिसॉर्टमधील CCTV फुटेज तपासले जात आहेत.

हा प्रकार उजेडात आल्याने रिसॉर्ट्समधील सुरक्षा आणि ग्राहकांच्या हालचालींच्या नोंदी याकडे आता गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा घटनांमुळे पर्यटनस्थळांची विश्वासार्हता डागळते, असा सूर स्थानिक व्यावसायिकांमध्ये बोलताना दिसून येत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

BMC Elections : महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची मोठी रणनीती ठरली! फडणवीस–शिंदे बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Central Railway : पनवेल–कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्ससाठी ४ दिवस रात्रकालीन ब्लॉक; अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल