BMC Budget 2025-26 : 4 फेब्रुवारीला सादर होणार मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 2025-26 येत्या 4 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले असून कोणत्या विभागाला किती रक्कम खर्चासाठी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

BMC Budget 2025-26 : मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी येत्या 4 फेब्रुवारीला महापालिकेचा अर्थसंकल्प 2024-25 सादर करणार आहेत. यामध्ये नागरिकांच्या मुलभूत सुविधांसांठी महापालिका काय निर्णय घेते याकडे सर्व मुंबईकरांचे लक्ष लागून असणार आहे. निवडणुकीचे वर्ष पाहता मुंबईकरांना एखाद्या नव्या टॅक्सची घोषणा केली जाईल याची शक्यता कमी वाटते. दुसऱ्या बाजूला गगरानी यांच्यावर मुंबईकरांना खूश करण्याचा दबाव असणार आहे. कारण वर्ष 2025 मध्ये महापालिकेच्या निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे. 

महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले की, निवडणुकीच्या वर्षात मुंबईकरांवर कोणत्याही नव्या टॅक्सचा बोझा घालण्याची रिस्क महापालिका आयुक्त घेऊ देखील शकतात. सूत्रांनुसार, यंदाच्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव पहायला मिळू शकतो. वर्ष 2024-25 साठी महापालिकेने 59954.75 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यंदाच्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प 65 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या एफडीमध्ये घट

महापालिकेच्या रिकाम्या तिजोरीत पैसे कुठून आणणार, त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणे हे आयुक्त गगराणी यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. कारण थांबलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापालिका एफडीमधून पैसे काढत आहे. वर्ष 2022 मध्ये महापालिकेची एफडी डिपॉझिट 91,690 कोटी रुपये होती जी वर्ष 2023 मध्ये 5 हजार कोटींनी कमी होत 86410 कोटी रुपये आणि वर्ष 2024 मध्ये कमी होऊन 80 हजार कोटी रुपये झाली आहे.

प्रत्येक वर्षी 4500 कोटींचा तोटा

कोरोनाच्या संकटानंतर महापालिकेकडून मुंबईकरांवर कोणताही नवा टॅक्स लावण्यात आलेला नाही. तर मुंबईत 500 स्क्वेअर फूटापर्यंतच्या घरांवरील प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्यात आला आहे. यामुळे महापालिकेला प्रत्येक वर्षी 4500 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. गगराणी यांना अर्थसंकल्पात अशा काही तरतूदी कराव्या लागणार आहेत ज्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत अतिरिक्त उत्पन्न वाढले जाईल.

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यावर लक्ष

महापालिकेने मुंबईत जवळजवळ 2 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी नवभारत टाइम्स यांच्यासोबत बातचीत करताना म्हटले की, महापालिकेच्या 2025-26 च्या अर्थसंक्लपात गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, रस्त्यांची दुरुस्ती, रस्त्यांवर सिमेंट घालणे, सीव्हरेज ट्रीटमेंट प्लांट, पाणी पुरवठ्यासाठी तयार होणाऱ्या टनलचे काम पूर्ण करणे, कोस्टल रोडला दहिसरपर्यंत वाढवणे अशा काही गोष्टींसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद असण्याची शक्यता आहे. याशिवाय नागरिकांच्या पायाभूत सुविधांसाठीही काही महत्वाचे निर्णय अर्थसंकल्पात घेतले जाऊ शकतात.

भांडवली खर्च वाढण्याची अपेक्षा

महापालिका आपल्या अर्थसंकल्पातील एक मोठा हिस्सा विकास योजनांवर खर्च करते. याची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते. गेल्या 8 वर्षांमध्ये महापालिकेच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्च वाढून सातपटीपेक्षाही अधिक झाला आहे. वर्ष 2017-18 च्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चाचा बजेट 25 टक्के होता, जो वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पात वाढून 53 टक्क्यांवर पोहोचला होता. काही प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासह यंदाच्या अर्थसंकल्पातही भांडवली खर्चामध्ये 5 ते 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा : 

Mumbai : चेंबूरमध्ये रहिवाशी इमारतीवर कोसळला मेट्रोचा पिलर

ठाकरे गटाचा महापालिका निवडणूक एकट्याने लढण्याचा निर्धार

Share this article