Badlapur–Karjat : मोदी सरकारकडून मोठी भेट! बदलापूर–कर्जत दुहेरी नवीन रेल्वेमार्गांना मंजुरी; 585 गावांना मिळणार वेगवान जोडणी

Published : Nov 27, 2025, 04:34 PM IST

Badlapur–Karjat 3rd & 4th Line Project : बदलापूर ते कर्जत दरम्यान तिसऱ्या, चौथ्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी दिली, ज्यामुळे मुंबई-पुणे कॉरिडॉरवरील भार कमी होईल. या प्रकल्पाने प्रवास वेगवान होणार असून ५८५ हून अधिक गावे रेल्वे नेटवर्कशी जोडली जाणारय.

PREV
16
बदलापूर–कर्जत दुहेरी नवीन रेल्वेमार्गांना मंजुरी

Badlapur–Karjat 3rd & 4th Line Project: बदलापूर ते कर्जत दरम्यानच्या गर्दीच्या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठं गिफ्ट जाहीर केलं आहे. तब्बल दोन नव्या रेल्वे मार्गिकांना म्हणजेच तिसरी आणि चौथी लाईनला हिरवा कंदील देण्यात आला असून या प्रकल्पामुळे 585 हून अधिक गावे रेल्वे नेटवर्कशी अधिक मजबूतपणे जोडली जाणार आहेत. प्रवास, उद्योग, रोजगार आणि दळणवळण या सर्व क्षेत्रांना यामुळे मोठा बुस्ट मिळण्याची अपेक्षा आहे. ही मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत देण्यात आली असून मुंबई–पुणे या महत्वाच्या कॉरिडॉरचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय गेमचेंजर ठरणार आहे. 

26
बदलापूर–कर्जत प्रवास होणार आणखी वेगवान आणि सोयीस्कर

बदलापूर–कर्जत या विभागासाठी ३२ किमी लांबीच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या विस्तारित मार्गामुळे

रेल्वे वाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल

गाड्यांचा वेग आणि वारंवारता सुधारेल

कोंडी व विलंब कमी होतील

प्रवासाचा वेळ लक्षणीय घटेल

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दृष्टीने हा कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा असून नव्या मार्गिकेमुळे भविष्यातील प्रवासी वाढ सहज पेलता येणार आहे. तसेच दक्षिण भारताशी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. 

36
बदलापूर–कर्जत प्रकल्पाची वैशिष्ट्ये

बदलापूर–कर्जत हा मार्ग उपनगरीय लोकल ट्रेनसाठी अत्यावश्यक म्हणून ओळखला जातो. या प्रकल्पात

३२ किमी लांबीचा रेल्वेमार्ग

8 मोठे पूल

106 लहान पूल

1 रोड अंडरब्रिज (RUB)

6 महत्त्वाची रेल्वे स्थानके

या प्रकल्पाचा एकूण खर्च 1,324 कोटी रुपये असून याची गुंतवणूक रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार 50-50 टक्के वाटून करणार आहेत. 

46
काय फायदे मिळणार?

तिसरी आणि चौथी मार्गिका पूर्ण झाल्यावर या प्रकल्पाचे स्पष्ट फायदे मिळणार आहेत.

मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठा दिलासा

गर्दी कमी

वेळेचे काटेकोर पालन

अधिक लोकल गाड्या चालवणे शक्य

मुंबई–पुणे प्रवास आणखी जलद

या दोन प्रमुख शहरांमधील ट्रॅफिकची क्षमता वाढेल. 

56
काय फायदे मिळणार?

मालवाहतुकीत विक्रमी बचत

अंदाजानुसार

दरवर्षी 7.2 दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक

41 लाख लिटर डिझेलची बचत

46.2 कोटी रुपये लॉजिस्टिक खर्चात बचत 

66
औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा

कल्याण–कर्जत–बदलापूर परिसरातील वेगाने होणारी औद्योगिक वाढ अधिक सुलभपणे हाताळता येईल.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories