मुंबई- भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांसाठी खास ‘फ्रीडम सेल’ची घोषणा केली आहे. देशांतर्गत उड्डाणांचे दर केवळ ₹1,279 पासून सुरू होत असून, आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठीची संधी फक्त ₹4,279 पासून मिळणार आहे.
एअरलाइनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत उड्डाणांचे भाडे ₹1,279 ते ₹4,279 दरम्यान असेल, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे भाडे ₹4,279 पासून सुरू होईल. या विशेष ऑफरचे बुकिंग 10 ऑगस्ट 2025 पासून एअर इंडिया एक्सप्रेसच्या अधिकृत वेबसाइटवर (www.airindiaexpress.com) आणि मोबाइल अॅपवर सुरू होईल. तसेच 11 ते 15 ऑगस्टदरम्यान ही सुविधा सर्व प्रमुख ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध असेल.
25
अंतिम तारीख 15 ऑगस्ट
बुकिंगची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 असून, प्रवास कालावधी 19 ऑगस्ट 2025 ते 31 मार्च 2026 असा आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या निष्ठावान प्रवाशांसाठीही अतिरिक्त सवलत दिली असून, गॉरमैयर गरम मील, केबिन आणि अतिरिक्त चेक-इन बॅगेज तसेच ‘एक्सप्रेस अहेड’ सेवांवर 20 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.
35
एक्सप्रेस लाइट भाड्यावर ‘शून्य’ शुल्क
एअरलाइनने प्रवाशांना काही महत्त्वाच्या अटी व नियमांची माहिती दिली आहे. सवलतीच्या दरात मूळ भाडे, कर आणि विमानतळ शुल्कांचा समावेश नसणार आहे. बुकिंगसाठी प्रवासी अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅपचा वापर करू शकतात. नेट बँकिंगद्वारे पेमेंट केल्यास एक्सप्रेस लाइट भाड्यावर ‘शून्य’ शुल्क आकारले जाईल.
फ्रीडम सेल अंतर्गत तिकीट रद्द केल्यास सवलतीची रक्कम परत केली जाणार नाही, तसेच या ऑफरवरील बुकिंग वैध राहणार नाही. मर्यादित जागा उपलब्ध असल्याने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर तिकीट मिळणार आहे. सवलतीच्या जागा संपल्यास प्रवाशांना नियमित दरांवर बुकिंग करावे लागेल.
55
नियम आणि अटी जाणून घ्या
पेमेंट पूर्ण झाल्यानंतर कोणताही परतावा मिळणार नाही. रद्द करण्याचे शुल्क एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे लागू होईल. तसेच कोणतीही पूर्वसूचना किंवा कारणाशिवाय ही ऑफर रद्द, समाप्त किंवा निलंबित करण्याचा अधिकार एअरलाइनकडे राखून ठेवला आहे. तिकीट रद्द झाल्यास प्रवाशांना कोणताही दावा किंवा भरपाई मिळणार नाही.