आईच्या पाठींब्यामुळे आज सीए झालो, डोंबिवलीतील व्हायरल व्हिडिओतील योगेशने आईप्रती दाखवली कृतज्ञता

Published : Jul 16, 2024, 03:35 PM IST
yogesh thombare

सार

डोंबिवली येथील योगेश ठोंबरे आणि त्यांची आई नीरा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये योगेश आईच्या पाया पडताना दिसतो. या व्हिडीओत योगेश आपल्या यशाचे श्रेय आईला देतो. 

आपल्याला जगात यशस्वी व्हायचे असेल तर आईचे आशीर्वाद सोबत असावे लागतात, त्यानंतर आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आपण कष्ट, मेहनत आणि जिद्दीने काम करत राहिल्यास आपल्या यशाच्या शक्यता वाढत जातात. डोंबिवली येथील एका मुलाचा त्याच्या आईसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये तो मुलगा आईच्या पाया पडत असल्याचे दिसून आले आहे. 

योगेश ठोंबरे आणि आई नीरा यांचा हा व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. ते या व्हिडिओमध्ये आईजवळ जाऊन तिचे दर्शन घेऊन भेट घेत असल्याचे दिसून आले आहे. या आईच्या मुलाने यश मिळवले असून त्या मुलाच्या यशात तिचा समावेश असल्याचे दिसून आले आहे. हा व्हिडीओ मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अकाऊंटवरून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

योगेशचा व्हिडीओ झाला व्हायरल - 
योगेशचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामधील योगेश यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या असून ते म्हणतात की, मी ही परीक्षा पास झालो खरा, पण माझ्या मेहनतीपेक्षा माझ्या आईची मेहनतच खरंतर फळली आहे. कारण मी कितीही अभ्यास केला असला तरी, जर माझ्या आईचा मला सपोर्ट नसता, ती जर खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली नसती मला आजचा हा दिवसच दिसला नसता. 

योगेश यांच्या आई या व्हिडिओमध्ये दिसून आल्या आहेत. त्यांच्या आई यावेळी भावुक झाल्या असून आपल्या लेकाने मोठे यश कमावल्याचे त्यांना जाणवले आहे. त्यांनी यावेळी आईने मला वेळोवेळी सपोर्ट केल्याचे दिसले आहे. आई वेळोवेळी मला चहा आणून द्यायची, तिला लिहिता वाचता येत नसले तरी माझी प्रश्नपत्रिका पाहत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

PREV

Recommended Stories

Mumbai Local : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! स्वयंचलित दरवाज्यांसह नव्या लोकल लवकरच धावणार, प्रवास होणार अधिक सुरक्षित
मुंबईत सर्वाधिक CO₂ उत्सर्जन; दिल्ली, पुणे, बंगळूरमध्येही धोकादायक पातळी!