Mumbai Rain : ऋतिक रोशन खऱ्या आयुष्यातही ठरलाय हिरो, 26 july 2005 रोजी वाचावला होता तरुणीचा जीव

Published : Jul 26, 2025, 12:15 AM IST

मुंबई - 26 जुलै 2005 रोजी मुंबईत महापूर आला होता. त्यात 1000 लोकांचा मृत्यू झाला होता तर 37000 रिक्षा, 4000 टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेस बुडाल्या होत्या. 20 वर्षानंतरही हा दिवस मुंबईकरांच्या चांगलाच स्मरणात आहे. या दिवशी ऋतिकने भीमपराक्रम केला होता.

PREV
16
20 वर्षानंतरही हा दिवस मुंबईकरांच्या चांगलाच स्मरणात

26 जुलै 2005 रोजी भारताच्या आर्थिक राजधानीत महापूर आला होता. त्यात 1000 लोकांचा मृत्यू झाला होता तर 37000 रिक्षा, 4000 टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेस बुडाल्या होत्या. 20 वर्षानंतरही हा दिवस मुंबईकरांच्या चांगलाच स्मरणात आहे. त्या भीषण आपत्तीत जेव्हा लोक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत होते तेव्हा बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याने आपल्या जीवाची पर्वा न करता एका तरुणीचा जीव वाचवला होता. त्या दिवशी त्याने आपण केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही हिरो असल्याचे सिद्ध केले होते.

26
पडद्यावरील हिरो ठरला प्रत्यक्षातही सुपरहिरो

20 वर्षांपूर्वी ऋतिक रोशन कॅमेऱ्याशिवायही खरा नायक ठरला होता. 26 जुलै 2005 च्या जलप्रलयात, मुंबईला थांबवणाऱ्या पावसात अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. तेव्हा ऋतिक प्रतिक्षा बंगल्याजवळ होता. तेव्हा त्याने धाडस दाखवून एका तरुणीचा जीव वाचवला होता. म्हणजे चित्रपटात जसे दाखवतात कुणी तरी संकटात असतं आणि सुपरहिरो त्यांचा जीव वाचवतो, अगदी तसेच तेव्हा घडले होते.

36
मानवी साखळी आणि धाडसी बचाव

त्या दिवशी मुंबईत महापूर आला होता. सगळे रस्ते पाण्याखाली गेले होते. त्या रस्त्यांमधून वाट काढणेही अवघड होते. कारण उघड्या गटारांमुळे त्यात पडून जीव जाण्याचाही धोका होता. त्यामुळे NMIMS कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून जुहू येथील होस्टेलपर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र होस्टेलपासून अवघ्या १० फूट अंतरावर एक मुलगी त्या साखळीमधून घसरली आणि पाण्यात वाहू लागली. तिला वाचण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. आता तिचा पाण्यात बुडून मृत्यू होणार हे जवळपास निश्चित होते. त्यावेळी तिथेच जवळच्या प्रतीक्षा बंगल्यात (अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान) असलेला ऋतिक रोशन याने तिला बुडताना बघितले. क्षणाचाही विचार न तो तिला वाचविण्यासाठी धावला. ती मुलगी कोण आहे, हेही त्याला माहिती नव्हते. त्याने तिचा जीव वाचवला. तिला सुरक्षितपणे पाण्याच्या बाहेर काढले.

46
साक्षीदाराचा ट्वीट

या घटनेचा साक्षीदार असलेल्या एका व्यक्तीने ट्वीट करत लिहिलं होतं, की “डीनने NMIMS वरून मुलींना जुहू होस्टेलपर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी आमच्यापैकी काही जणांना सांगितलं होतं. शेवटच्या १० फूट अंतरावर एक मुलगी साखळीमधून घसरली आणि बुडाली. ऋतिक प्रतीक्षा बंगल्यातून बाहेर आला आणि तिला वाचवलं. खऱ्या हिरोला कॅमेऱ्याची गरज नसते.”

56
सोन्यासारखं हृदय असलेला सुपरस्टार

ऋतिक रोशन नेहमीच आपल्या अभिनयासाठी आणि फिटनेससाठी ओळखला जातो. पण या एका कृतीमुळे तो एक मोठ्या मनाचा, शूर आणि सजग नागरिक म्हणूनही ओळखला गेला.आज २० वर्षांनंतर, जेव्हा मुंबई त्या संकटावर मात केल्याचा दिवस साजरा करते, तेव्हा या नायकाच्या कृत्याची आठवण करून देणं गरजेचं आहे.

66
हिरो बनण्यासाठी

"हिरो बनण्यासाठी स्पेशल इफेक्ट्स लागतात असं नाही... काही वेळा फक्त एक धैर्यशील मन आणि दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा पुरेशी असते." हीच ऋतिक रोशनच्या त्या दिवशीच्या कृत्याची खरी ओळख आहे.

Read more Photos on

Recommended Stories