Mumbai : मुंबईत चिकन बर्गरचे सेवन केल्याने एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय काहीजणांचीही प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Mumbai : मुंबईतील मानखुर्द येथे महाराष्ट्र नगर परिसरात चिकन बर्गरचे सेवन केल्याने फूड पॉइजनिंगमुळे एका 19 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय 12 हून अधिकजणांना रुग्णालयात उपचरासाठी दाखल करण्यात आले आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी सदर घटनेप्रकरणात गुन्हा दाखल करत बर्गर विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. दरम्यान, याआधीही गोरेगाव येथे अशीच घटना घडली होती. रस्त्यालगत अससणाऱ्या पदार्थाचे सेवन केल्यानंतर 18 जणांना फूड पॉइजनिंगचा त्रास झाला होता.
नक्की काय घडले?
ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (06 मे) काहीजणांनी एका फूड स्टॉलवरून पिझ्झा-बर्गरचे सेवन केले. याच्या अर्ध्या तासानंतर सर्वांना उलटी आणि मळमळ होण्यास सुरुवात झाली. यामुळे घरातील मंडळींनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. यामधील काहीजणांना उपचार केल्यानंतर रात्री उशिरा घरी पाठवण्यात आले.
दोन जणांन अटक
फूड पॉइजनिंगच्या कारणास्तव प्रथमेश भोकसे याला आधी खासगी रुग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर प्रथमेशची प्रकृती अधिक बिघडू लागल्याने केईएम रुग्णालयात हलवण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात ट्रॉम्बे पोलिसांनी दोन जणांना अटक करत पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, या प्रकरणात अधिक तपास केला जातोय. चिकन बर्गरमध्ये नक्की काय होते, ज्यामुळे नागरिकांनी प्रकृती बिघडली गेली याबद्दलची अधिक माहिती मिळवली जातेय. अशातच महापालिकेने रस्त्यावरील अवैध फूड स्टॉलच्या विरोधात कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.
आणखी वाचा :
संतापजनक! मुंबईतील रुग्णालयात महिलेची मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात केली प्रसूती, वाचा पुढे काय घडले...