
गणपती येऊन १० दिवस होऊन गेले तरी बाप्पा आपल्यातच आहेत हेच वाटत राहतं. आज भक्तगण गणपती बाप्पाच्या मुर्त्या घेऊन बुडायला नदीच्या दिशेने चालले आहेत. हे अतिशय भावुक दृश्य असून हे पाहून प्रत्येकालाच दुःख होत आहे. आज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कोकणातील गणेश विसर्जनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मोराने वाट अडवली असून लोक बाप्पाला घेऊन चालल्यामुळे त्याने रस्ता अडवला असल्याचं दिसून आलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांमध्ये नक्कीच पाणी येईल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण गाव मिरवणुकीला निघाल्याचा दिसून आलं आहे.
गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला यावेळी सर्वजण निघाले आहेत. यावेळी सर्वांच्या डोक्यावर गणपतीच्या मुर्त्या आहेत. सर्वजण बाप्पाचा जयघोष करत नदीवर विसर्जनासाठी जात असताना मध्येच एक मोर आला. दोन मिनिटं जागेवर तो गोलगोल फिरला आणि मग उडून गेला. दरम्यान, लोकांनी या मोराकडे नाचून दाखवण्याची विनंती सुद्धा केली.
या व्हिडिओला इंस्टाग्रामवर २५ लाख लोकांनी पाहिलं आहे. त्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी मोराला म्हणतंय, “माझ्या घरावर येऊन डान्स कर,” तर कोणी मोराच्या गणेश भक्तीचं कौतुक करतंय. काहींच्या मते, असे चमत्कार फक्त कोंकणातच पाहायला मिळतात. तर काही जण म्हणत आहेत, “कार्तिकेयनं बाप्पाला परत येण्यासाठी वाहन पाठवलं.” असो, हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला? तुम्ही आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या.