Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात हवामान खात्याने १९ ऑक्टोबर रोजी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई: महाराष्ट्रात हवामान पुन्हा एकदा बदलताना दिसत आहे. काही भागांत उकाडा वाढलेला असताना, काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 19 ऑक्टोबर रोजी राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. याठिकाणी वादळी वाऱ्यांसह यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
27
कोकण आणि मुंबई परिसरात काय स्थिती?
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये कोरडे आणि अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मात्र रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विजांसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांसाठी Yellow Alert दिला आहे.
37
पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याचा जोर
पुणे, कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्याच्या परिसरात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूरमध्ये ढगाळ हवामान आणि हलक्या सरी पडू शकतात.
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत कोरडे वातावरण, तर लातूर, नांदेड आणि धाराशिवमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे.
57
उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस
धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये कोरडे वातावरण राहण्याची शक्यता असली तरी नाशिक आणि घाटमाथ्याच्या परिसरात हलक्या सरी पडू शकतात. अहिल्यानगर जिल्ह्यात वीजा आणि वाऱ्यांसह पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.
67
विदर्भात उष्णता कायम
अकोला, नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा आणि इतर जिल्ह्यांमध्ये कोरडे व गरम वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
77
काय घ्याल काळजी?
राज्यातील वातावरण सतत बदलत असल्यामुळे नागरिकांनी हवामानाच्या इशाऱ्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित स्थळी थांबा आणि गरज नसल्यास बाहेर जाणं टाळा.