अखेर ठरलं, अण्णा हजारे या मागणीसाठी सरकारविरोधात उपोषणाला बसणारच

Published : Jun 24, 2026, 07:12 PM IST
 anna hazare

सार

समाजसेवक अण्णा हजारे ५ जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. माहिती अधिकार कायद्यातील शुल्कवाढ, ओळखपत्र सक्ती आणि एक विषय एक अर्ज यांसारख्या नियमांमधील बदलांना त्यांनी विरोध केला आहे. याप्रकरणी सरकारसोबतची त्यांची चर्चा निष्फळ ठरली आहे.

समाजसेवक आण्णा हजारे हे परत एकदा उपोषणाला बसणार आहेत. माहिती अधिकार कायद्यातील काही नियमांमध्ये बदल केल्यामुळं त्यांनी उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं. अण्णांनी उपोषणाला बसू नये म्हणून सरकारकडून खास प्रयत्न केले जात आहेत. परंतु अजून तरी काहीच तोडगा निघालेला नाही.

५ जुलैपासून अण्णांच्या उपोषणाला होणार सुरुवात 

अण्णा हजारे यांच्या उपोषणाला ५ जुलैपासून सुरुवात होणार असल्याचं सांगितलं आहे. अण्णा हजारे आणि मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यात बैठक झाली. पण ती बैठक निष्फळ ठरली. माहितीच्या अधिकाराअंतर्गत अर्ज करायचा असेल तर शुल्कवाढ, ओळखपत्र सक्ती आणि एक विषय एक अर्ज या मुद्यांना अण्णांनी विरोध केला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अण्णा हजारे यांनी पत्र पाठवले आहे. आंदोलनाबाबतचा निर्णय हा सरकार आणि अण्णा असा दोघांना मिळून घ्यायचा आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत लागू करण्यात आलेले नियम मागे घेण्यात यावेत असं मागणी अण्णा हजारे यांनी पत्रातून सरकारकडे केली आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Abhijeet Dipke: आजीचं निधन, तरीही अभिजीत डिपके पोलिसांच्या ताब्यात; CJP कडून सुटकेची मागणी
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल