Ketan Agarwal Death : केतन अग्रवालच्या बहिणीचा एक प्रश्न आणि.... 'त्या'दिवशीच्या घटनेनंतर संशय, असा झाला घटनेचा उलगडा

Published : Jun 24, 2026, 06:42 PM IST
Ketan Agarwal Death Case Pune Crime

सार

केतन अग्रवाल या २६ वर्षीय मुलाला लोहगड किल्ल्यावरुन ढकलून त्यांच्याच होणाऱ्या पत्नीने संपवलं. सुरुवातीला ही दुर्घटना वाटत होती, मात्र केतनच्या बहिणीला एक गोष्ट संशयास्पद वाटली आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

पुणे : पुण्यात १८ जून रोजी केतन अग्रवाल या २६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. लोहगड किल्ल्यावरुन ४०० फूट खोल दरीत पडून त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही केवळ एक दुर्घटना वाटत होती, पण हा केवळ मृत्यू नव्हता तर केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच सियाने त्याला लोहगड किल्ल्यावरुन ढकलून संपवलं होतं. केतनच्या मृत्यूनंतर सर्वजण हे अॅक्सिडेंटल डेथ समजत असताना केतनच्या घरातील एक व्यक्ती तिला यात काहीतरी संशयास्पद वाटलं आणि संपूर्ण प्रकरणचं पलटलं.

केतनच्या अंत्यसंस्काराच्या चार दिवसांनी त्याची होणारी पत्नी घरी आली होती. त्यावेळी केतनच्या बहिणीने सियाला काही प्रश्न विचारले. त्याचवेळी सियाच्या उत्तरांनी केतनच्या बहिणीला संशय आला पुढे संपूर्ण धक्कादायक घटनेचा खुलासा झाला.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनच्या मृत्यूनंतर संपूर्ण प्रकरण शांत झालं होतं. पण केतनच्या बहिणीने सियाला ती घरी आल्यानंतर अगदी सहजपणे त्या दिवशीच्या अपघातासंबंधी, अपघाताच्या आधी नेमकं काय काय घडलं होतं असे अनेक प्रश्न विचारले. मात्र, केतनच्या बहिणीने काही वेळाने रोखठोक प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा सियाच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे बदलू लागले. केतनच्या बहिणीला उत्तर देताना सियाच्या बोलण्यात सतत विसंगती होती. स्वत:चं दिलेल्या विधानांशी ती विसंगत बोलत होती. तिची हीच उत्तर केतनच्या बहिणीला संशयास्पद वाटली आणि बहिणीच्या मनात संशय आला. त्यानंतर लगेचच तिने कुटुंबियांना आणि पोलिसांना याची माहिती दिली. केतनच्या बहिणीच्या माहितीनंतर या संपूर्ण घटनेचा हळूहळू उलगडा होत गेला आणि सियाचं भयंकर सत्य समोर आलं.

केतनच्या बहिणीला सियावर संशय आला नसता, तिने प्रश्न विचारले नसते तर आज केतनचा मृत्यू केवळ एक दुर्घटना किंवा अपघात असंच वाटलं असतं. पोलिसांनीही हा केवळ अपघात समजून हे प्रकरण बंद केलं असतं, पण केतनच्या बहिणीला आलेल्या संशयानंतर पोलिसांनी कसून तपास केला आणि अनेक धागेदोरे समोर आले. मृत केतनच्या पालकांनी या प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल पोलिसांचा आभार मानले आहेत.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Abhijeet Dipke: आजीचं निधन, तरीही अभिजीत डिपके पोलिसांच्या ताब्यात; CJP कडून सुटकेची मागणी
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल