अंदाज लावला नसेल एवढा निधी ओमराजे निंबाळकरांना, धाराशीवची कार्यकारणी मात्र बरखास्त

Published : Jun 24, 2026, 04:39 PM IST
eknath shinde

सार

शिंदे सेनेच्या 'ऑपरेशन टायगर'मुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, उद्धव ठाकरे गटातील ६ खासदार शिंदे सेनेत दाखल झाल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी १८ कोटींचा विकास निधी जाहीर केला आहे. निंबाळकर यांच्या कट्टर विरोधक अर्चना पाटील यांनीही त्यांचे महायुतीत स्वागत केले आहे.

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या ऑपरेशन टायगरमुळे शिंदे सेना चर्चेत आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील ६ खासदारांनी आता शिंदे सेनेत प्रवेश केला. धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी शिंदे यांनी पटपट निर्णय घेतल्याचं दिसून आलं आहे. येथील सर्व संघटनांच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत.

किती निधी केला जाहीर?

धाराशीव जिल्ह्यासाठी एकनाथ शिंदे यांनी १८ कोटींचा निधी जाहीर केला आहे. विविध विकास कामांसाठी हा निधी एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. खासदार निंबाळकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी हे निधी वाटप धाराशीव जिल्ह्यासाठी केलं आहे.

पाटील यांनी ओमराजे यांचं केलं स्वागत 

खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कट्टर विरोधक अर्चना पाटील यांनी महायुतीमध्ये स्वागत केलं आहे. त्यांनी निंबाळकर हे महायुतीत आले असतील तर त्यांना आमचं सहकार्यच असेल असं म्हटलं. अर्चना पाटील यांनी २०२४ मध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता भविष्यात धाराशीवचा विकास कसा होतो याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Abhijeet Dipke: आजीचं निधन, तरीही अभिजीत डिपके पोलिसांच्या ताब्यात; CJP कडून सुटकेची मागणी
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल