देवाभाऊच्या कोट्यवधींच्या जाहिराती कोणी दिल्या, रोहित पवारांनी सांगितलं 'या' मंत्र्यांचं नाव

Published : Sep 07, 2025, 10:30 AM IST
rohit pawar and devendra fadnvis

सार

अनंत चतुर्दशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'देवभाऊ' म्हणून वृत्तपत्रांत आणि विमानतळांवर जाहिराती झळकल्या. 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे मुंबईतील आझाद मैदानावर आरक्षणाला बसले होते. यावेळी सरकारने त्यांच्या मागणीवर तोडगा काढला आणि समाजाला आरक्षण दिले. सरकारकडून काढण्यात आलेल्या जीआरमुळे दोन्ही घटकांचे समाधान झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मास्टरस्ट्रोक मारल्याची सुद्धा चर्चा रंगली आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिल्या जाहिराती 

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देवभाऊ अशी म्हणून जाहिरात देण्यात आली होती. पहिल्या आणि दुसऱ्या पानावर देवाभाऊंच्या जाहिराती झळकल्या होत्या. या जाहिराती मात्र कोणी दिल्या याबाबतची माहिती समजली नव्हती. आता आमदार रोहित पवार यांनी या जाहिरातींबाबतची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे.

कोणत्या मंत्र्याने जाहिरात दिली? 

मित्रपक्षाच्या एका मंत्र्याने ही जाहिरात दिल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं या जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपये कुठून आले यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आमदार रोहित पवार यांनी या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये कोठून आले? हा मंत्री कोण? असे असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तर नक्कीच मिळतील, असे त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

रोहित पवार काय म्हणाले? 

एकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली, परंतु मा. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी एवढी मोठी जाहिरात दिल्याची माहिती रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ते पुढं बोलताना म्हणतात की, या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचे समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपाचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असे देखील कळत आहे. मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

महाराष्ट्रात 'थंडीचा कहर'! तापमान 'मायनस'मध्ये जाणार; 'या' ३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा!
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!