
पुणे: पुण्यातील विसर्जन मिरवून दुसऱ्या दिवशीपर्यंत लांबल्याचं दिसून आलं आहे. काल रात्री १२ वाजता डीजे बंद केल्यानंतर काही मंडळांनी मिरवणूक थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आज सकाळी ६ वाजल्यापासून डीजे वाजवायला सुरुवात केली असून परत गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.
काल मध्यरात्री नंतर पुण्यातील श्रीमंत भाऊसासेब रंगारी, अखील मंडई , हुतात्मा बाबू गेणू या गणेश मंडळांच्या गणपतींचं विसर्जन पार पडलं आहे. बाप्पाचे विसर्जन हे पर्यावरण पूरक हौदामध्ये करण्यात आलं. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी या गणपती बाप्पाची मूर्ती यावेळी हौदात विसर्जित करण्यात आली आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी या गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन हे ३.५० ला करण्यात आलं.
2025 - मिरवणुकीला सुरूवात : सकाळी 9.30 वाजता सुरू झाली
2024 - एकूण 28 तास 45 मिनिटे
मिरवणुकीला सुरूवात : सकाळी 10.15 वाजता
मिरवणूक संपली : दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता
2023 – एकूण 30 तास 25 मिनिटे
2022 – एकूण 31 तास