महाराष्ट्रात कुठं होणार मुसळधार पाऊस कुठं तुरळक, वादळी वाऱ्यासह या भागाला दिला रेड अलर्ट

Published : Jul 02, 2026, 11:46 PM IST
Monsoon Health

सार

हवामान विभागाने मुंबईसह महाराष्ट्रात उद्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात उद्या मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यायला हवी हे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. आपण कोणत्या जिल्ह्याला रेड अलर्ट आणि कोणत्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

अतिवृष्टीची शक्यता वर्तवली 

हवामान विभागाच्या वतीने अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे.

विजांच्या कडकडाटासह पडणार 

पाऊस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मेघगर्जना सोबत ४०-५० किमी वेगाने सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. तुरळक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

बिष्णोई गँगकडून आता या आमदाराला धमकी, यावर विधानसभेत रणकंदन
Ketan Agarwal Case : लग्नानंतर राजस्थानला राहण्याचा प्लॅन; सियाकडून पैशांची सोय, चेतनच्या मित्रांची माहिती