बिष्णोई गँगकडून आता या आमदाराला धमकी, यावर विधानसभेत रणकंदन

Published : Jul 02, 2026, 05:15 PM IST
bishnoi gang

सार

अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिष्णोई गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे प्रकरण विधानसभेत गाजले. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आमदाराच्या सुरक्षेची मागणी करत, बिष्णोई गॅंग मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाही अशी टीका करत सरकारला धारेवर धरले.

मुंबई - काँग्रेसचे अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांना फेब्रुवारी २०२६ मध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याचे पडसाद आता विधानसभेत उमटले आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडला आहे. त्यांनी साजिद खान पठाण यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

नाना पटोले काय म्हणाले? 

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. नाना पटोले यांच्यासोबत विजय वडेट्टीवार यांनी आमदाराची बाजू मांडली होती. नितेश राणे यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, सदर धमकी हि सरकारच्या वतीने गंभीरपणे घेतली आहे. सभागृहातील एकाही सदस्याला मिळणारी धमकी खपवून घेतली जाणार नाही. ते पोलिसांकडे द्यावेत, त्यावर नक्की कारवाई होईल.

मुख्यमंत्र्यांचे बिष्णोई गॅंग ऐकत नाही 

नाना पटोले यांनी यावेळी बोलताना सरकारचे बोलणे खोडून काढले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात आपली भूमिका मांडली. गुंडांना सोडले जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगून परत धमकी दिली. याचा अर्थ बिष्णोई गॅंग मुख्यमंत्र्यांचे ऐकायला तयार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

तुकाराम मुंडेंनी दूध व्यवसायासाठी आणले ८ नियम, पालन केलं नाहीतर होणार कडक कारवाई
नरहरी झिरवळ यांचा घातक एनर्जी ड्रिंकबाबत निर्णय, थेट इशारा