
जून महिना संपल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. मात्र पावसाने अचानक आराम घेतला आहे. ढग दिसत होते पण पाऊस मात्र सगळीकडून गायब झाला होता. हवेत आता उकाडा जाणवत असून शेतकरी टेन्शनमध्ये पडला आहे. आता मात्र परिस्थिती बदलून जाईल अशी शक्यता निर्माण झाली.
पुढील आठवड्यापासून मान्सून सक्रिय होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. या नव्या टप्यामध्ये ईशान्य भारतापासून सुरुवात होऊन पूर्व, मध्य आणि उत्तर भारतातील अनेक भागात पावसाचा जोर वाढू शकतो. महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार सरी तर काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मोठ्या प्रमाणावर वाढली होती. दिवसभर ढगाळ वातावरण असलं तरी पाऊस येत नव्हता. त्यामुळं दमटपणा मोठ्या प्रमाणावर वाढत चालला होता. पुणे आणि मुंबई शहरात नागरिकांना बाहेर पडणं अवघड झालं होतं. आता मात्र अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळं पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यावेळी आपल्याकडं चांगल्या प्रमाणात पाणी वाहायला लागेल. पावसाचा हंगाम समाधानकारक होण्याची शक्यता वर्तवली आहे. आता सर्वांचे लक्ष हे हवामान बदलाकडं लागून राहील आहे. मान्सून खरंच कधी सक्रिय होतो हे लवकरच समजेल.