लाचार होणार हिंदू नाही, उद्धव ठाकरेंची तोफ नागपुरात धडाडली

Published : Jul 18, 2026, 09:06 PM IST
Uddhav Thackeray Ram Raksha Andolan in Nagpur

सार

नागपूर येथे उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन केले. येथील राम मंदिरात रामरक्षा पठण केल्यानंतर त्यांनी भाषण देत भाजपवर टीका केली. यावेळी त्यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेची आठवण करून दिली.

नागपूर: नागपूर येथे जाऊन उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन केलं. येथील प्रसिद्ध राम मंदिरात रामरक्षा पठण करत आंदोलन पार पडलं. त्यांनी रामरक्षा पठण केल्यानंतर तिथं भाषण केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. त्यांनी यावेळी मला बाबरीचे दिवस आठवत असल्याचा खासकरून उल्लेख केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

बाबरी पाडण्यात आली त्यावेळी आता सत्तेत असणार कोणीच पुढं आलं नव्हतं. त्यावेळी फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे पुढं आले होते. त्यावेळी भाजपावाले म्हणत होते की हे आमचं काम नाही. ते शिवसैनिकांचा काम असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी बाळासाहेबांच्या बाजूला मी उभा होतो असं उद्धव यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब काय म्हणाले होते? 

हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला अभिमान आहे असं यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. गर्व से कहो हम हिंदू है अशी यावेळी बाळासाहेबांनी घोषणा केली. अनेकांनी बलिदान दिलं. त्यावेळी अनेक पोलीस कायमचे अपंग झाले. बाळासाहेबांनी तो धोका स्वतःच्या डोक्यावर घेतला. राम मंदिराच्या पैशातून आमदार खासदार विकत घेतल्याचा उल्लेख यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या टीमने बेंगलोर अय्यंगार बेकरीवर टाकली धाड, घाण पाहून डोकं होईल बधिर
रामरक्षा विरुद्ध हनुमान चालीसा! उद्धव ठाकरे-नवनीत राणा पुन्हा आमनेसामने