महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'बद्दल मोठी घोषणा केली आहे. या योजनेचा हप्ता ४ नोव्हेंबरपासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यावर कधी जमा होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्याबद्दलची अपडेट महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली असून आपण माहिती जाणून घेऊयात.
26
महिलांना हप्ता कधी भेटणार?
लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांना आजपासून म्हणजेच ४ नोंव्हेंबरपासून खात्यात जमा करायला सुरुवात होणार आहे. याबाबतची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर दिली आहे.
36
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
यावेळी बोलताना आदिती तटकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वितरणाला उद्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल.
महाराष्ट्रातील माता भगिनींच्या विश्वासाने सुरु असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वी मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल पुढं चालू ठेवण्यासाठी ई केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
56
लाडक्या बहिणींनी १८ नोंव्हेंबरच्या आधी केवायसी करावी पूर्ण
लाडक्या बहिणींनी ई केवायसीची -प्रक्रिया १८ नोंव्हेंबरच्या आधी पूर्ण करावी असं सांगण्यात आलं आहे. ही पद्धत बंधनकारक करण्यात आल्यामुळे महिलांची धाकधूक वाढली आहे.
66
तांत्रिक अडचणी दूर करून प्रक्रिया केली सुलभ
आदिती तटकरे यांनी तांत्रिक अडचणी दूर करून प्रक्रिया सुलभ केल्याची माहिती यावेळी सोशल मीडिया पोस्टमधून दिली आहे. त्यांनी १९ नोंव्हेंबरपर्यंत केवायसी करणे बंधनकारक असल्याचं सांगितलं.