महाराष्ट्रात लवकरच पाऊस कोसळणार, 'या' तारखेला पावसाचा वर्तवला अंदाज

Published : Jun 17, 2026, 10:17 PM IST
IMD Monsoon Rain Alert

सार

जून महिना अर्धा संपला तरी महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही, ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनला उशीर होत असला तरी, २५ जूननंतर पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

जून महिना सुरु होऊन १५ दिवस झाले तरी पाऊस अजूनही कोसळला नाही. शेतकरी पावसाच्या आशेने आभाळाकडे पाहत बसले आहेत. एल निनोचा प्रभाव असल्यामुळं पावसाळा सुरु होण्यास वेळ होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण आता पाऊस वेग धरणार असून लवकरच तो आपल्याकडं दाखल होईल असं सांगण्यात आलं आहे.

पेरणीयोग्य पाऊस झाला नाही 

अजूनही महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यात पाऊस कधी येणार आणि शेतकरी कधी पेरणी करणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे. जुलै आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पाऊस लांबणार नाही ना अशी भीती शेतकरी राजाला लागून राहिली आहे.

जुलै ते सप्टेंबर महिन्यात होणार कमी पाऊस 

जुलै ते सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. २५ जून रोजी ओडिसा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळं २५ जूननंतर पाऊस सक्रिय होईल असं सांगण्यात आलं आहे.

मध्य महाराष्ट्रात पाऊस कधी येणार 

मध्य महाराष्ट्रात पाऊस लवकरच दाखल होईल असं सांगण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी पेरणीला घाई करू नये. सरकारकडून पेरणी कधी करावी याबद्दलची सूचना देण्यात येईल. त्यानंतरच शेतात पेरणी करावी असं सांगण्यात आल आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक